

वर्धा जिल्ह्यातील विरूळजवळ भीषण अपघात
दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली
भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला
पुलगाव-आर्वी मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली झाला अपघात
वर्धामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भयंकर अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. पुलगाव- आर्वी रोडवरील विरुळजवळ ही अपघाताची घटना घडली. या दोन्ही दुचाकींमधील धडक इतकी भयंकर होती की त्यावरून प्रवास करणारे तिघे जणही दूरवर फेकले गेले. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांचा जास्त रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला. अपघतानंतर या रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलगाव-आर्वी मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली मंगळवारी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विरूळजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. एक दुचाकी पुलगावच्या दिशेने तर एक दुचाकी विरुळच्या दिशेने जात होती. या दोन्ही वाहनांचा वेग अधिक असल्याने अपघाताची तीव्रता जास्त होती. अपघातामध्ये दोन्ही दुचाकींचे तुकडे झाले. या अपघाताची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
या अपघातात योगेश रामकृष्ण मेश्राम (रा. साळफळ), देवेंद्र त्र्यंबक दरने (रा. दरने टाकळी) आणि गंगाधर पंढरीनाथ दरने (रा. दरने टाकळी) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले. अपघात नेमका कशामुळे झाला याचा पुढील तपास पुलगाव पोलिस करत आहेत. या हृदयद्रावक अपघातामुळे साळफळ आणि दरने टाकळी परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. अपघातामध्ये दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला. या अपघातानंतर पोलिसांनी दोन्ही दुचाकी रस्त्यावरून बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. घटनेची माहिती तिन्ही मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. या तिन्ही मृतांच्या कुटुंबीयांना घटनेमुळे मोठा धक्का बसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.