Badlapur Accident : बदलापूरमध्ये भीषण अपघात, कारने मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद

Badlapur Accident CCTV Video : बदलापूर रेल्वे उड्डाणपुलावर मनसे पदाधिकारी राजेश शेटे यांच्या दुचाकीला भरधाव कारची जोरदार धडक बसली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी चालकाविरुद्ध तपास सुरू केला आहे.
Badlapur Accident CCTV Video
Badlapur Accident CCTV Video
Published On

मयूरेश कडव, बदलापूर प्रतिनिधी

Badlapur Accident, MNS Leader Accident : बदलापूरमध्ये मनसे पदाधिकाऱ्याच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपगातात राजेश शेटे गंभीर जखमी झाले आहेत. राजेश शेटे दुचाकीवरून रस्ता क्रॉस करत होते, त्याचवेळी समोरून आलेल्या कारने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात शेटे यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बदलापूरमधील या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. बदलापूर रेल्वे उड्डाणपुलावर हा अपघात घडला.

अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या वाहनचालकांनी तात्काळ शेटे यांना मदत केली. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीसांनी या प्रकरणी नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे. कारचालकाने जाणूनबुजूनन दुचाकीला धडक दिली का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Badlapur Accident CCTV Video
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? ₹१५०० वर अपडेट आली, आज निर्णय होण्याची शक्यता

बदलापूरच्या पूर्व पश्चिम उड्डाणपुलावर सोमवारी रात्री मनसे पदाधिकारी राजेश शेटे यांच्या दुचाकीला एका कारने जोरात धडक दिली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. राजेश शेटे दुचाकीवर राँग साईडने येत होते, त्यावेळी एका भरधाव कारने त्यांना उडवलं. याअपघातानंतर चालक फरार झाला आहे. तर शेटे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे. बदलापूर पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Badlapur Accident CCTV Video
शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर गोळीबार! दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या; महाराष्ट्र हादरला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com