

रणजीत माजगावकर
Baby shower: संपूर्ण भारतात चंदेरीनगरी म्हणून प्रसिध्द असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे येथील गायीच्या डोहाळे जेवणाची. हुपरी येथे राहणारे किसन माने या शेतकऱ्याने गायीवर असलेल्या प्रेमापोटी चक्क डोहाळे जेवणाचा आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम केला आहे.(Latest Cow News)
गौरी असे या गायीचे नाव असून ती सध्या तीन वर्षांची आहे. तिच्या या डोहाळे जेवणाला आणि ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला गावातील शेकडो महीला उपस्थित होत्या याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
कोल्हापुरातील (Kolhapur) हुपरी या गावात राहणारे किसन माने हे शेतकरी असून त्यांची वडीलोपार्जित शेती आहे. त्यांना गो पालनाचीही आवड असल्याने ते गायी ही पाळतात. इतर गायी सोबतच त्यांच्याकडे गौरी नावाची ही गाय आहे. गौरी अगदी १५ दिवसांची असताना माने यांनी तिला घरात आणले. अगदी लहान बाळाप्रमाणे तिचं संगोपन केलं, त्यांनी गौरीला बाटलीमधून दूध पाजले.
दिवसेंदिवस गौरीशी माने कुटुंबीयांची नाळ घट्ट होत गेली. आज ही गौरी गाय तीन वर्षांची झाली असून ती नऊ महिन्याची गर्भवती आहे. त्यामुळे माने यांनी अगदी आपल्या मुली प्रमाणे असलेल्या गौरी गायीचं डोहाळे जेवण आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी आपले मित्र,पै-पाहुणे आणि गल्लीतील अनेकांना त्यांनी आमंत्रण दिले.
गायीचं (Cow) डोहाळे जेवण (Baby Shower) असल्याने उत्साहाने सर्व महिला जमल्या. महीलांनी गौरीचे औक्षण करत ओटीही भरली आणि आशिर्वादही घेतला. तिला यावेळी सुंदर सजवण्यात आले दारात गायीची रांगोळी ही काढली आणि मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. माने कुटुंबियांनी या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकासाठी स्नेहभोजणाचीही व्यवस्था केली होती. गायीची ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला शेकडो महीला पुरुष उपस्थित होते. अनेक जण या कार्यक्रमाचे आणि माने कुटुंबीयांचे कौतुक करत आहेत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.