Heart Attack Viral Video : बाइक चालवत असतानाच आला हृदयविकाराचा तीव्र झटका, काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं

Viral Video News : मध्य प्रदेशातील बरवानी येथील ही घटना आहे.
Viral Video
Viral Video Saam Tv
Published On

Madhya Pradesh News : हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. हृदयविकाराच्या झटक्याच्या अनेक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाल्या आहेत.

जीम, ऑफिस, रस्त्यावरील घडलेल्या घटनांचे मन सून्न करणारे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. अशीच एक घटना मध्य प्रदेशमधून समोर आली आहे.

मध्य प्रदेशातील बरवानी येथील ही घटना आहे. येथे शनिवारी दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमवावा लागला आहे. तरुणाच्या मृत्यूची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाली आहे.  (Latest News)

Viral Video
Man Dies While Dancing : नाचता नाचता तरुणाचा मृत्यू; 45 सेकंदांचा मन सुन्न करणारा VIDEO, शेवट तर भयंकर

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर  व्हायरल  होत आहे. अशोक सोळंकी असं मृत तरुणाचं नाव आहे. घटनेनंतर तातडीने आजूबाजूच्या लोकांनी अशोकला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुण गाडी चालवत होता. दरम्यान त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तो आपली दुचाकी घेऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर जचाऊन पडला आणि काही सेकंदात या तरुणाने जीव सोडला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com