

Prabhas Fan Viral Video: चाहत्यांमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्यांची क्रेझ कायम आहे, अनेकदा त्यांचे चित्रपट प्रदर्शित वेगवेगळे ट्रिक्स वापरत चर्चेत येतात. आपल्या आवडत्या दाक्षिणात्य सेलिब्रिटीसाठी फॅन्स वेडे असतात. नुकताच प्रभासचा ‘आदिपुरूष’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. प्रभासचा गेल्या काही वर्षांपूर्वी बाहुबली चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी अनेकदा चाहत्यांनी त्याचा दुधाचा अभिषेक केला होता. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत फॅन्सचा एक वेगळाच स्वॅग आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यावेळी प्रभासच्या फॅनने मात्र हद्दच पार केली. नेमकं त्याने काय केलंय जाणून घेऊया.
चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान अनेक प्रेक्षक ढोल ताशाच्या तालावर नाचताना दिसले, तर अनेकांनी फटाकेही फोडले. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रभासच्या चाहत्याने असे काही धक्कादायक कृत्य केले आहे, जे पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर प्रभासचा फॅन्सचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
त्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत प्रभासच्या फॅन्सने थेट बियरच्या बाटलीने त्याचा हात हात कापला. त्याच रक्ताने हा प्रभासचा चाहता ‘आदिपुरूष’च्या पोस्टरवर प्रभासच्या कपाळावर टिका लावताना दिसत आहे. हा व्हिडिओ आंध्रप्रदेश किंवा तेलंगणातील असल्याचं समजतंय.
नेमकं व्हायरल व्हिडीओत काय आहे?
प्रभासच्या या चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्या माणसाने हातात तुटलेली काचेची बॉटल घेऊन चित्रपटाला मिळत असलेल्या यशाबद्दलचा जल्लोष करताना दिसत आहे. त्या तुटलेल्या बाटलीने चाहत्याने आपले मनगट कापतो आणि त्याच रक्ताने ‘आदिपुरूष’च्या पोस्टरवर टिका लावला.
तर व्हायरल व्हिडीओत अनेक चाहते प्रभासच्या पोस्टरसमोर नारळ फोडताना आणि प्रभासला हार घालताना दिसत आहेत. आदिपुरुष चित्रपटाबद्दल सध्या सोशल मीडियासह सर्वत्रच दोन गट निर्माण झाले आहेत.
अनेकांनी चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतला आहे तर न आवडणाऱ्या प्रेक्षकांनी चित्रपटाला वेगवेगळ्या कारणावरून ट्रोल केले.
चित्रपट पहिल्याच दिवशी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटातील राम, सीता, रावण आणि हनुमान या पात्रांचा समावेश असलेली कथित आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची किंवा दुरुस्त करण्याचे निर्देश चित्रपटाविरोधात हिंदू सेनेच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
आदिपुरुष चित्रपट १६ जूनला थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असून चित्रपटाने एकाच दिवसात ९५ कोटींची छप्पर फाडके कमाई केली आहे. तर जगभरात चित्रपटाने १२५ कोटींच्या आसपास कमाई केली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रभास प्रभु श्री रामांच्या, क्रिती सेनन माता जानकीच्या तर, सनी सिंग लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे.
सोबतच देवदत्त नागे हनुमानाच्या तर, सैफ अली खान रावणाची व्यक्तीरेखा साकारतोय. चित्रपटातील कलाकारांनी ही तगड मानधन घेतले आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच कोट्यावधींची कमाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.