Neha Kakkar Divorce: अखेर घटस्फोटाच्या चर्चांवर नेहानेच दिला पूर्णविराम, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Neha Kakkar And Rohanpreet Singh Divorce Rumours: गेल्या काही दिवसांपासून नेहा आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग यांच्यात काही बिनसलं असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
Neha Kakkar And Rohanpreet Singh New Romantic Photo
Neha Kakkar And Rohanpreet Singh New Romantic PhotoInstagram
Published On: 

Neha Kakkar And Rohanpreet Singh New Romantic Photo: बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर नेहमीच आपल्या गाण्यांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून नेहा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात आली आहे. नेहा आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग यांच्यात काही बिनसलं असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

नेहा आणि पती रोहनप्रीत सिंग यांचं २० ऑक्टोबर २०२० रोजी लग्न झालं होतं. नेहमीच आपल्या आवाजामुळे प्रसिद्ध असलेली कंगना सध्या घटस्फोटच्या चर्चांमुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Neha Kakkar And Rohanpreet Singh New Romantic Photo
Karan Deol - Drisha Acharya's Sangeet : लग्न करणचं पण सेलिब्रेशन संपूर्ण देओल कुटुंबाचं! संगीत सोहळ्यात देओलांचा एकच जल्लोष

गेल्या काही दिवसांपूर्वी नेहाने तिचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या बर्थडे पार्टीला तिचे कुटुंबीय आणि तिचे काही खास मित्रमंडळी यावेळी उपस्थित होते. पण तिच्या बर्थडे पार्टीला नवरा रोहनप्रीत दिसून आला नाही. त्याच्या न येण्याने तेव्हापासून सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या. नेमकं दोघांमध्ये काही मतभेद आहेत का?, हे कपल लवकरच घटस्फोट घेताय का? अशा चर्चा देखील सोशल मीडियावर होऊ लागल्या. चाहत्यांच्या या कमेंट पाहून नेहानं मात्र याविषयावर मौन बाळगलं आहे.

मात्र नेहाने आता नेटकऱ्यांची बोलतीच बंद केली आहे. नेहाच्या या एका कृतीमुळे नेटकऱ्यांची बोलतीच बंद झाली आहे. नुकतंच नेहाने सोशल मीडियावर पती रोहनप्रीतसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती रोहनप्रीतसोबत रोमँटिक फोटोशूट केले आहे. सध्या अभिनेत्रीचे आणि तिच्या पतीचे फोटो पाहून अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

शेअर केलेल्या फोटोत नेहाने ब्लॅक रंगाचा ड्रेस तर रोहनप्रीतने पांढरा शर्ट घातला असून त्यावर काळी पगडी घातलीय. नुकतीच ती आणि तिचा पती दोघेही एका ठिकाणी फिरायला गेले होते. कॅप्शनमध्ये तिने तिच्या अप्रतिम प्रवासाबद्दल चाहत्यांना सांगितले.

Neha Kakkar And Rohanpreet Singh New Romantic Photo
Kangana Ranaut On Adipurush: ‘राम का नाम बदनाम ना करो...'; कंगनाच्या ट्विटचा रोख नेमका कोणाकडे?

अभिनेत्रीच्या शेअर केलेल्या फोटोवर तिच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. सध्या त्या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनी तिने स्पष्ट सांगितल्याबद्दल तिचे कौतुकही केलेय.

एक युजर म्हणतो, ‘तुम्ही फोटो पोस्ट केले त्याबद्दल देवाचे आभार, अनेकांना वाटत होते तुम्ही घटस्फोट घेतला.’ तर काही नेटकऱ्यांनी रोहनलाच प्रश्न केला की, ‘इतके दिवस कुठे होता ?’ असा सवाल केला आहे. घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच अचानक अभिनेत्रीने तिचे आणि नवऱ्याचे फोटो शेअर केल्यामुळे तिच्यावर कौतुक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.