Aathvani New Marathi Movie: पत्रातून उलगडणार दोन पिढ्यांची प्रेमकथा; सुहास जोशी-मोहन आगाशे यांच्या 'आठवणी'चा टीजर प्रदर्शित

Aathvani Teaser Out: 'आठवणी' हा नवीन मराठी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.
Aathvani Teaser Out
Aathvani Teaser OutSaam TV
Published On

Athavani Marathi Movie Teaser Released : चित्रपट आणि प्रेमकथा यांचे वेगळे नाते आहे. आपण आजपर्यंत अनेक प्रेमकथा चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्या आहेत. अशीच एक जुनी प्रेमकथा नाव्ह्याने आपल्या भेटीला येत आहे.

'आठवणी' हा नवीन मराठी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. एक प्रेमकथा या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. (Latest Entertainment News)

Aathvani Teaser Out
Karan Deol - Drisha Acharya's Sangeet : लग्न करणचं पण सेलिब्रेशन संपूर्ण देओल कुटुंबाचं! संगीत सोहळ्यात देओलांचा एकच जल्लोष

आठवणी चित्रपटाचा टीजर

मिनाश प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या टीजरची सुरुवात शाळेतील मित्र-मैत्रिणींच्या पुस्तकाची देवाण-घेवाण करण्यापासून होते. सुहास जोशी आवाज देण्यात आला आहे. चित्रपटाची कथा थोड्याक्यात सांगण्याचा प्रयत्न टीजरमध्ये करण्यात आला आहे.

एक लेखक जो कथेच्या शोधात असतो. त्याला एका पाकिटात एक पात्र मिळत त्यातून ती कथा सुरू होते. त्यानंतर चित्रपटातील लेखक सुहास जोशींनी भेटतो. सुहास जोशी आणि मोहन आगाशे यांच्यावर आधारित ही प्रेमकथा आहे असून प्रत्येकजण त्यात नक्की हरवून जाईल. तर या चित्रपटामध्ये एक प्रेमकथा दाखविण्यात आली नसून, दोन कथा पाहायला मिळतात.

चित्रपटामध्ये सुहास जोशी, मोहन आगाशे, सुहृय वार्डेकर, वैष्णवी करमरकर, निनाद सावंत हे कलाकार दिसणार आहे. 'आठवणी' हा चित्रपट ७ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com