vijay wadettiwar
vijay wadettiwarsaam tv

Truck Driver Strike: वाहतुकदारांच्या पाठीशी काॅंग्रेस, आंदाेलन सुरुच ठेवा : विजय वडेट्टीवार (पाहा व्हिडिओ)

तरी सरकारला जाग येत नसेल तर हा नाकर्तेपणाचा कळस आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली
Published on

Chandrapur News :

नवीन हिट अँड रन कायदाच्या (New Hit And Run Law) विराेधात राज्यभरात ट्रक चालकांतून संताप व्यक्त केला जात आहे. हा नवा हिट अँड रन काळा कायदा आहे. हा कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी सरकारकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली आहे. (Maharashtra News)

नव्या हिट अँड रन कायद्याच्या (New Hit And Run Law) विराेधात आजही (मंगळवार) राज्यभरात ट्रक चालकांनी संप (truck driver strike) सुरुच ठेवला आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात इंधन, भाजी पूरवठा, धान्य पूरवठा यावर परिणाम झाला आहे.

vijay wadettiwar
Satej Patil: कूठल्या विद्वानाने हे डाेकं चालवलं! 'राजाराम'चा निर्णय अन्यायकारक, सतेज पाटील आक्रमक

वाहतुकदारांनी सुरु केलेले हे आंदाेलन याेग्य असल्याचे मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नाेंदविले. ते म्हणाले वाहनचालक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. त्यामुळे इंधनाचा तुटवडा आणि जनजीवन विस्कळीत होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तरी सरकारला जाग येत नसेल तर हा नाकर्तेपणाचा कळस आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. सोबतच या आंदोलनाला पाठिंबा दिला असून जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवावे आणि आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

vijay wadettiwar
Raviknat Tupkar : 'एक व्होट आणि एक नोट'; वाचा रविकांत तुपकरांचा संकल्प

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com