Satej Patil: कूठल्या विद्वानाने हे डाेकं चालवलं! 'राजाराम'चा निर्णय अन्यायकारक, सतेज पाटील आक्रमक

rajaram sahakari sakhar karkhana : राजाराम कारखाना आणखी आर्थिक अडचणीत येईल अशी भीती सतेज पाटलांनी व्यक्त केली.
satej patil morcha aganist rajaram sahakari sakhar karkhana policy
satej patil morcha aganist rajaram sahakari sakhar karkhana policysaam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या (rajaram sahakari sakhar karkhana) अन्यायकारक ऊस तोडणीविरोधात आज (मंगळवार) आमदार सतेज पाटील (mla satej patil) यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी मार्केट यार्डातील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. या माेर्चात शेकडाे शेतकरी सहभागी झाले आहेत. (Maharashtra News)

यावेळी माेर्चेक-यांनी सभासदांचा ऊस नेलाच पाहिजे अशी घाेषणाबाजी केली. सतेज पाटील म्हणाले साखर कारखान्याद्वारे विरोधकांचा ऊस तोडला जात नाही. एका बाजूला कारखानदारी अडचणीत आहे. त्यातच ऊस घेऊन जात नाहीत. त्यामुळे कारखाना आणखी आर्थिक अडचणीत येईल. कूठल्या विद्वानाने हे डाेकं चालवलं! असेही पाटील यांनी नमूद केले.

satej patil morcha aganist rajaram sahakari sakhar karkhana policy
Petrol Diesel Tanker Drivers Strike: भटकंतीस आलेल्या पर्यटकांची पेट्रोल- डिझेलसाठी काेकणात भ्रमंती

खरंतर सर्वांचा ऊस नेला पाहिजे असेही सतेज पाटील यांनी म्हटले. दहा किलाेमीटर आणि पाच किलाेमीटर अंतरावरील चांगल्या प्रतीचा ऊस कारखाना आणत नसेल तर कसला हिताचा निर्णय म्हणायचा हा असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निवडणुक काळात देखील जे सभासद शेतकरी त्यांनी रद्द केले त्याचा निर्णय आमच्या बाजूने झाला. हा कारखाना आता सहकार ऐवजी खाजगी कारखाना करुन टाका अशी टीका देखील सत्ताधा-यांवर सतेज पाटील यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

satej patil morcha aganist rajaram sahakari sakhar karkhana policy
Kolhapur News : बहुमताच्या जोरावर राजाराम सहकारी साखर कारखाना तुमच्या नावावर करुन टाका; सतेज पाटलांचा महादेवराव महाडिकांना टाेला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com