Raviknat Tupkar : 'एक व्होट आणि एक नोट'; वाचा रविकांत तुपकरांचा संकल्प

नवीन शिक्षण प्रणाली आणणे ,बेरोजगारी हटविणे हे प्रश्नी सभागृहात मी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ravikant tupkar to contest lok sabha election from buldhana constituency
ravikant tupkar to contest lok sabha election from buldhana constituency Saam tv
Published On

Buldhana News :

नवीन वर्षात (New Year 2024) रविकांत तुपकर (ravikant tupkar latest marathi news) हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवणार (buldhana constituency) आहेत. मी संसदेत निश्चित जाईन असा विश्वास रविकांत तुपकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केला. (Maharashtra News)

रविकांत तुपकर म्हणाले मी गेल्या २० वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करीत आहे. त्यामुळे मी १०० टक्के संसदेत जाईलच. ज्या प्रश्नासाठी मी लढतोय त्या प्रश्नाचं मूळ दिल्लीत आहे.

तुपकर पुढे म्हणाले सगळ्या शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा माझ्यावर दबाव आहे की तुम्ही लोकसभा निवडणूक (loksabha election) लढून दिल्लीला जायला पाहिजे आणि सरकारला आमचे प्रश्न सोडवायला भाग पाडलं पाहिजे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगामी काळातील हाेणारी लोकसभा निवडणूक लोकसहभागाने आणि लोक वर्गणीतून आम्ही लढणार आहे. १०० टक्के मी बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा. "एक व्होट आणि एक नोट" या तत्त्वावर मी निवडणूक लढणार , कारण मी फाटका माणूस, माझ्याकडं पैसे नाहीत. मी भ्रष्टाचार करत नाही. माझ्याकडे नंबर दोनचे पैसे नाहीत असेही तुपकर यांनी स्पष्ट केले.

ravikant tupkar to contest lok sabha election from buldhana constituency
Ayodhya Ram Mandir: सव्वा दोन कोटी रामनाम जप पुस्तिका पाठविल्या जाणार अयोध्येला, नंदनगरीतील नागरिकांचा उपक्रम

बुलढाणा जिल्हा हा आत्महत्या ग्रस्त जिल्हा आहे. हा कलंक मला पुसायचा आहे असेही तुपकरांनी नमूद केले. कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळवून देणे हे माझं पहिल काम असणार आहे. नवीन शिक्षण प्रणाली आणणे ,बेरोजगारी हटविणे हे प्रश्नी सभागृहात मी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

ravikant tupkar to contest lok sabha election from buldhana constituency
Navegaon Nagzira Tiger Reserve : ताडोबातून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आणले जाणार तीन वाघ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com