मी जरांगेला भाव देत नाही; काँग्रेस नेत्याची सडकून टीका

Vijay Wadettiwar Statement On Manoj Jarange And OBC Reservation: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका करत ओबीसी आरक्षणाच्या हक्कावर कुणालाही गदा आणू देणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार.
VIJAY WADETTIWAR SLAMS MANOJ JARANGE OVER OBC RESERVATION ROW
VIJAY WADETTIWAR SLAMS MANOJ JARANGE OVER OBC RESERVATION ROWsaam tv
Published On

काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपली रोखठोक भूमिका मांडली. मी जरांगेंना फारसं महत्त्व किंवा भाव देत नाही. जरांगे यांनी सरकारचे कपडे उतरावावेत आणि सरकारने जरांगेचे कपडे उतरवावेत. त्यांनी एकमेकांशी काय लढावं, याच्याशी आम्हाला काही घेणं-देणं नाही, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला.

VIJAY WADETTIWAR SLAMS MANOJ JARANGE OVER OBC RESERVATION ROW
मराठा आरक्षणाची बैठक संपन्न; मनोज जरांगे CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी धडकणार? पाटलांची रणनीती काय?

आरक्षणाच्या प्रमाणपत्रावर बोलताना ते म्हणाले, आमच्या वाट्याचं कुणालाही देऊ नये आणि आमच्या वाट्याचं कोणी हिरावून घेऊ नये. ज्याप्रमाणे EWS साठी आरक्षण १० टक्क्यांनी वाढवून ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली, त्याचप्रमाणे गरज असल्यास आणखी १० ते २० टक्के आरक्षण वाढवून दिले पाहिजे.

VIJAY WADETTIWAR SLAMS MANOJ JARANGE OVER OBC RESERVATION ROW
Jarange Patil: 'एकतर मी जाईन, नाहीतर सरकार...'; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, 29 ऑगस्टला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

ओबीसींमधील जातींचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले, ओबीसींमध्ये आधीच ३८६ जातींचा समावेश आहे. आधी चार पोटा होत्या, आता आणखी चार पोटा वाढल्यानंतर पोळीचा आकारही वाढवला पाहिजे. जरांगेंच्या नादाला कुणी लागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु ओबीसींच्या नादाला कुणीही लागू नये, हा आमचा स्पष्ट इशारा आहे.

VIJAY WADETTIWAR SLAMS MANOJ JARANGE OVER OBC RESERVATION ROW
मोठी बातमी! शिंदें-फडणवीसांवर मनोज जरांगे भडकले; 'त्या' वक्तव्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले असून उद्यापासून ते आंतरवालीसराटीमध्ये उपोषणाला बसणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्स्थानी धडकणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे. तत्पूर्वी जरांगे यांची समजूत काढण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ यांनी देखील भेट घेऊन आंदोलन न करण्याचे आवाहन केले. मात्र जरांगे हे उपोषणावर ठाम असून उद्यापासून ते आंतरवालीसराटीत उपोषणाला सुरुवात करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com