गाडगेबाबांचा सहवास लाभलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड, बापूसाहेब देशमुख यांचे निधन

Bapusaheb Deshmukh Passes Away : संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा जपणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व गाडगे बाबा मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे.
Bapusaheb Deshmukh Passes Away
Bapusaheb Deshmukh Passes AwaySaam TV marathi
Published On

अमर घटारे , अमरावती प्रतिनिधी

Bapusaheb Deshmukh death news : कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा आयुष्यभर जपणारे, 'गाडगे बाबा मिशन, मुंबई'चे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी या गाडगेबाबांच्या अंतिम श्रद्धास्थानी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आज सायंकाळी ५ वाजता अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

बापूसाहेब देशमुख यांना संत गाडगेबाबांचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता. गाडगेबाबांनी संपूर्ण महाराष्ट्रात उभारलेल्या शाळा, आश्रमशाळा आणि धर्मशाळांच्या माध्यमातून गोरगरिबांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्यात बापूसाहेबांचे मोलाचे योगदान होते.

Bapusaheb Deshmukh Passes Away
राजकारणात खळबळ! भाजप खासदारावर गुन्हा दाखल, ८७ समर्थकांची FIR मध्ये नावं; नेमकं प्रकरण काय?

जीवनभर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी जपणाऱ्या बापूसाहेबांनी संत गाडगेबाबांचा अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी मोलाचे कार्य केले. 'गाडगे बाबा मिशन'च्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. गाडगेबाबांच्या विचारांशी कधीही तडजोड न करता समाजसेवा हेच त्यांनी आपले जीवनकार्य मानले होते.

Bapusaheb Deshmukh Passes Away
Today's Horoscope: या ६ राशींसाठी आजचा दिवस ठरणार 'गोल्डन संडे'! कोणावर होणार पैशांचा पाऊस? पाहा १२ राशींचे भविष्य

बापूसाहेब देशमुख यांच्या निधनाने गाडगेबाबांच्या विचारांवर निष्ठा ठेवून जगणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत असून, सामाजिक क्षेत्रातून मोठा शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात मुले, मुली व आप्तपरिवार असा मोठा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com