मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून सरकारची सत्ता जात नाही; अण्णा हजारेंचं थेट पीएम मोदींना पत्र

Anna Hazare Wrote Letter Prime Minister Modi: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय.शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच लोकशाहीशी संबंधित प्रश्न संवादातून सोडवले जावेत यावरही त्यांनी भर दिला आहे.
Anna Hazare  Wrote Letter Prime Minister Modi:
Veteran social activist Anna Hazare has written to Prime Minister Narendra Modi,saam tv
Published On
Summary
  • अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

  • शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी पत्रातून केली.

  • लोकशाहीत संवादाला महत्त्व देण्याचा सल्ला सरकारला दिला.

केंद्र सरकारनं शिक्षणमंत्र्यांच्या राजीनामा घ्यावा अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. अण्णा हजारे यांनी पत्र लिहूनही मागणी केलीय. लोकशाहीत जनतेचा आवाज दडपण्याऐवजी संवादातून प्रश्न सोडवला पाहिजे. मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून सरकारची सत्ता जात नाही. असं अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. (Anna Hazare letter to PM Modi demanding minister resignation)

Anna Hazare  Wrote Letter Prime Minister Modi:
विद्यार्थ्यांची माफी मागा, राहुल गांधींनी सरकारला ठणकावलं; शिक्षणव्यवस्थेवर ठेवलं बोट, आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांकडं वेधलं लक्ष

दिल्लीमधील जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची आणखी बळ मिळणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हेही विद्यार्थ्यासाठी न्यायासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करणार आहेत. अहिल्यानगरमधील वाडिया पार्क येथील गांधी स्मारक येथे ते मौन आंदोलन करणार आहेत. त्याआधी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. या पत्रातून त्यांनी धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सरकारनं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्त्वात काँग्रेसनेही मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. आता ज्येष्ठ अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे उद्या सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील गांधी स्मारक येथे मौन आंदोलन करणार आहेत.

Anna Hazare  Wrote Letter Prime Minister Modi:
शेतकरी कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार, बँक खात्यात कधीपर्यंत येणार पैसा? सरकारनं सांगितली संपूर्ण प्रक्रिया

सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवावेत, अशी भूमिका अण्णा हजारे यांनी मांडलीय. लोकशाहीत संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याने अण्णा हजारे यांनी चिंता व्यक्त केलीय. या आंदोलनस्थळाला प्रतिकात्मक स्वरूपात "नगरचे जंतर मंतर" असे नाव देण्यात येणार आहे. या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मंत्र्याचा राजीनामा घेतला तर सरकारची सत्ता जात नाही, असा सल्ला देत अण्णा हजारे यांनी सरकारचे कान टोचले आहेत. सरकार ज्याप्रमाणे आंदोलन दडपण्याचं प्रयत्न करत आहे, त्यावरून त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलंय. सोनम वांगचूक यांना हटविण्याची पद्धत लोकशाहीच्या भावनेला धरून नसल्याची टीकाही अण्णा हजारे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com