

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्राथमिक यादी जाहीर
पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार
कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता निकषांची पडताळणी केली जाणार
शेतकरी कर्जमाफीच्या यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्राथमिक यादी जाहीर केली आहे.
सरकार कर्जमाफीचं यादी कधी जाहीर करणार असा प्रश्न शेतकरी गेल्या काही दिवसापासून विचारत होते. राज्य सरकारने शेतकऱ्यांची २ लाख रुपयांपर्यंतची थकीत कर्ज माफ करण्याचा निणर्य घेतला आहे. कर्जमाफीच्या यादीसह सरकारनं शेतकऱ्यांना लाभ कसा मिळणार याची माहितीही दिलीय.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात काही सुधारणा करत सरकारने आज यादी जाहीर केली आहे. या योजनेतील कर्जमुक्ती व एकवेळ समाझोता (OTS) या घटकाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 12 राष्ट्रीयकृत बँका व इतर खासगी बँका मिळून एकूण 53 बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती या योजनेकरीता महाआयटीमार्फत विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलीय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या सर्व खात्यांची माहिती सहकार विभागातील लेखापरिक्षकांमार्फत तपासणी करण्यात आली आहे.
आजी व माजी लोकप्रतिनिधी, सर्व नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सर्व शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी / कर्मचारी, शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दुधसंघ व बाजार समिती या संस्थांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. या सर्व घटाकांची माहिती संबंधित विभागाकडून /संस्थांव्दारे पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यासह योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर आधार व्हेरिफाईड करण्याबाबत (SMS) संदेश पाठविण्यात येणार आहे.
या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय तसेच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिध्द करण्यात येणार आहे.
सदर यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना त्याचे आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक असेन.
राज्यात सध्या कार्यरत असलेल्या सुमारे 32 हजार आपले सरकार सेवा केंद्रातून पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय.
याप्रमाणे आधार व्हेरिफाईड करण्यापूर्वी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक (Agristack) वरील नोंदणी आवश्यक आहे. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर लाभाची रक्कम DBT व्दारे हस्तांतरित करण्यात येईल.
राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांच्या बाबतीत वरील संपूर्ण प्रक्रिया दि. 31.07.2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.