तरुणाने पाणी मागितलं अन् तोंडावर लघुशंका, संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती; मराठवाडा हादरला

Vaijapur Case Rohit Pathare Brutal Assault Allegations: वैजापूरमध्ये रोहित पठारे या तरुणाच्या हत्येने मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. पाणी मागितल्यानंतर तोंडावर लघुशंका केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Rohit Pathare
Rohit Patharesaam tv
Published On: 

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या हत्येच्या वेळी आरोपींनी संतोष देशमुख यांच्यावर अमानुष अत्याचार केल्याचं समोर आलं होतं. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्येही अशाच प्रकारची संतापजनक घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. जुन्या वादातून रोहित पठारे या तरुणाला मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर पाणी मागितल्यावर त्याच्या तोंडावर लघुशंका केल्याचा गंभीर आरोप आहे. या हत्या प्रकरणानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज मंत्री संजय शिरसाट मृत रोहित पठारेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.

Rohit Pathare
Thane : ऐन दिवाळीत ठाणे ATS ची मोठी कारवाई; १० लाखांचे बक्षीस असलेला झारखंडचा नक्षलवादी अटकेत

यावेळी कुटुंबीयांनी आपला आक्रोश व्यक्त करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच आरोपींना मदत करण्यात आली आणि पोलिसांनी सुरुवातीला तक्रार घेण्यास टाळाटाळ केली, असा गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केला. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

Rohit Pathare
एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या! पत्नीसह सासरच्यांना संपवून मृतदेह विविध ठिकाणी फेकले; हादरवणारी घटना

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनीही पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथकं रवाना करण्यात आली आहेत.

Rohit Pathare
Shocking : नवी मुंबई हादरली! रात्री दोन तरुणींवर गोळीबार; परिसरात खळबळ

दुसरीकडे, पीडित कुटुंबाला सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करू, अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.