Thane : ऐन दिवाळीत ठाणे ATS ची मोठी कारवाई; १० लाखांचे बक्षीस असलेला झारखंडचा नक्षलवादी अटकेत

Thane ATS News : ठाणे ATS ची मोठी कारवाई! झारखंडमध्ये अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या आणि १० लाखांचे बक्षीस जाहीर झालेल्या संजय सरोज यादव उर्फ बुधारामला डोंबिवलीजवळील ठाकुर्लीतून अटक.
Thane ATS News
Thane ATS NewsAI Image
Published On: 
Summary
  • ठाणे दहशतवादविरोधी पथकाने (ATS) दिवाळीत मोठी कारवाई करत नक्षलवाद्याला अटक केली

  • संजय सरोज यादव उर्फ संजय गोधरे उर्फ बुधाराम असे आरोपीचे नाव

  • आरोपीवर झारखंडमधील विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी

  • झारखंड सरकारने आरोपीच्या अटकेसाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते

ऐन दिवाळीत ठाणे दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. झारखंडमध्ये अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या आणि फरार असलेल्या एका नक्षलवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या नक्षलवाद्याला पकडण्यासाठी झारखंड सरकारने तब्बल १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

संजय सरोज यादव उर्फ संजय गोधरे उर्फ बुधाराम असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. तो ४५ वर्षांचा असून झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील देवगन गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरातून ATS च्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

Thane ATS News
Old Monk : ओल्ड मॉन्कची विक्री पुन्हा सुरु होणार? अखेर कंपनीने 'ती' अट मान्य केली

ऐन दिवाळीत ही कारवाई करण्यात आल्याने पोलिस यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. झारखंडमध्ये फरार असलेला आणि मोठे बक्षीस जाहीर झालेला नक्षलवादी महाराष्ट्रात नेमका कशासाठी आला होता, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. दिवाळीच्या काळात एखादा घातपात घडवण्याच्या उद्देशाने तो ठाणे जिल्ह्यात आला होता का, याचाही तपास ATS कडून केला जात आहे. त्याच्यासोबत आणखी कोणाचे संबंध आहेत का, तसेच महाराष्ट्रात त्याचे काही साथीदार आहेत का, याचीही माहिती तपास यंत्रणा घेत आहेत.

Thane ATS News
NCMC Card Update : राज्यातील महिलांना सरकारचं दिवाळी गिफ्ट, NCMC कार्डबाबत घेतला मोठा निर्णय

या अटकेमुळे झारखंडमधील नक्षलवादी कारवायांशी संबंधित आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अटकेनंतर आरोपीला लवकरच ठाणे न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ATS च्या या कारवाईमुळे दिवाळीच्या काळात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.