Shocking : नवी मुंबई हादरली! रात्री दोन तरुणींवर गोळीबार; परिसरात खळबळ

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर १ मधील एसएस-३ परिसरात दोन तरुणींवर गोळीबार. दोघींवर उपचार सुरू. संशयिताचा पोलीसांकडून शोध सुरू.
Navi Mumbai News
Navi Mumbai News AI Image
Published On: 
Summary
  • नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर १ मधील एसएस-३ परिसरात गोळीबार

  • या हल्ल्यात दोन तरुणी गंभीर जखमी

  • एका तरुणीच्या कानाजवळ, तर दुसऱ्या तरुणीच्या पाठीला गोळी लागली

  • जखमींना पुढील उपचारांसाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवले

नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात दोन तरुणींवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सेक्टर १ मधील एसएस-३ परिसरात हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुणी गुरुवारी रात्री परिसरात असताना त्यांच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एका तरुणीच्या कानाजवळ गोळी लागली, तर तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मैत्रिणीच्या पाठीला गोळी लागली. दोघीही या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. घटना घडल्यानंतर जखमी तरुणींना तातडीने उपचारासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Navi Mumbai News
Bank Holiday : धनत्रयोदशी बँक बंद राहणार की सुरु? जाणून घ्या RBI चे महत्त्वाचे अपडेट्स

मात्र, त्यांची प्रकृती लक्षात घेता पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या दोघींवर तेथे उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत या प्रकरणातील मुख्य आरोपी अर्जुन चव्हाणला अटक केली आहे. मात्र, या घटनेत सहभागी असलेला दुसरा संशयित राकेश चव्हाण हा गोळीबारानंतर घटनास्थळावरून पळून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

Navi Mumbai News
Aortic Stenosis : सततचा थकवा दुर्लक्षित करू नका! हार्टच्या 'या' भयंकर आजाराची असू शकतात लक्षणे

दरम्यान, दोन तरुणींवर गोळीबार करण्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हा हल्ला कोणत्या कारणातून करण्यात आला, याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींमध्ये आणि जखमी तरुणींमध्ये आधीपासून काही वाद होता का, यासह इतर बाबींचीही चौकशी केली जात आहे.कोपरखैरणेसारख्या गजबजलेल्या परिसरात रात्रीच्या वेळी घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोपरखैरणे पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.