Maharashtr Politics : 'डुबकी मारली तरी गद्दारच'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, VIDEO

Uddhav thackeray vs eknath shinde : एकनाथ शिंदेंच्या महाकुंभ स्नानावरुन ठाकरेंनी पुन्हा गद्दारीचा मुद्दा पुढे केलाय... ठाकरेंनी शिंदेंना कसं डिवचलंय? शिंदे महाकुंभात कुणाचं पाप धुवायला गेले होते? आणि फडणवीस शिंदेंच्या मदतीला कसे धावले? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.....
Maharashtra Politcs
Uddhav thackeray vs eknath shinde Saam tv
Published On

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना महाकुंभातील डुबकीवरुन डिवचलंय.. 50 खोके घेऊन गंगेत डुबकी मारली तर त्याचा काय फायदा? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय...तर एकनाथ शिंदे आपल्या मंत्री आणि आमदारांसह महाकुंभमेळ्यात स्नानासाठी गेले होते.. त्यावरुन ठाकरेंनी शिंदेंवर टीका केलीय.. तर मी तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेसोबत केलेल्या गद्दारीचं पाप धुण्यासाठी गंगेत डुबकी मारल्याचा पलटवार शिंदेंनी केलाय...

डुबकी मारली तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. त्यानंतर तुमचं पाप धुण्यासाठी महाकुंभात गेलो, असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.

Maharashtra Politcs
Walmik Karad : वाल्मिक कराडला VIP ट्रिटमेंट? पोलीस अधिकाऱ्यांकडून तुरुंगात बडधास्त? VIDEO

उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावून आलेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ठाकरेंनी पुन्हा शिंदेंच्या गद्दारीचा मुद्दा उपस्थित केलाय.. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत फेल ठरलेला गद्दारीचा मुद्दा मुंबई महापालिका निवडणुकीत तरी ठाकरेंना तारणार का? याकडे लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com