Walmik Karad : वाल्मिक कराडला VIP ट्रिटमेंट? पोलीस अधिकाऱ्यांकडून तुरुंगात बडधास्त? VIDEO

Walmik Karad Latest news : सरपंच हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.. मकोकातील आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगात स्पेशल ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप करण्यात आलाय.. हा आरोप कुणी केला आहे आणि विरोधकांनी नेमकी काय मागणी केलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.
walmik Karad News
walmik Karad Saam tv
Published On

सरपंच हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड मकोकाच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे...मात्र तुरुंगातच वाल्मिक कराडची शाही बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय.. त्यामुळे देशमुख कुटुंबिय आक्रमक झालंय.. तर प्रशासनाकडे जेलच्या सीसीटीव्हीची मागणी करणार असल्याचं देशमुख कुटुंबियांनी सांगितलंय.

walmik Karad News
Walmik Karad : 'आकाची नार्को टेस्ट करा', सुरेश धस यांची मागणी, कुणाचं टेन्शन वाढणार?

कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे, असा दावा संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी केला. कराड हा धनुभाऊचा माणूस आहे, असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय. तर अंजली दमानियांनी कराडचे निकटवर्तीय असलेल्या पोलीसांची यादी सांगत सरकारवर निशाणा साधलाय..

walmik Karad News
Walmik Karad: वाल्मिक कराड 'भविष्य' पाहण्यासाठी दिंडोरीत? शरण जाण्यापूर्वी कराडनं पाहिलं भविष्य?

कराड धनुभाऊचा माणूस असल्याने VIP ट्रिटमेंट, असा आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. तर तुरुंगातील सीसीटीव्ही हवा तेव्हा ऑन-ऑफ केला जातो, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

walmik Karad News
Walmik Karad Gang : कराड तुरूंगात, गँग कोण चालवतंय? धनंजय देशमुखांचे गंभीर आरोप

सरपंच हत्या प्रकरणात एसआयटीने वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर चौदाशे पानांचं आरोपपत्र दाखल केलंय.. मात्र कराडची शाही बडदास्त ठेवली जात असल्याच्या आरोपामुळे कराडला इतर जिल्ह्याच्या तुरुंगात हलवलं जाणार का? आणि वाल्मिकची व्हीआयपी ट्रिटमेंट देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com