Vijay Wadettiwar : नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, वडेट्टीवार यांच्या अडचणीत वाढ, राज्यभर आंदोलन

Jagadguru Narendra Maharaj : जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे अनुयायांमध्ये मोठा संताप आहे.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar
Published On

Vijay Wadettiwar News : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केल्याने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी संतप्त झाले असून त्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. नागपूर, पुणे, नाशिक अन् संभाजीनगरसह राज्यभरात वडेट्टीवार यांच्याविरोधात आंदोलनं केली जात आहेत.

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी वडेट्टीवर यांनी अपमानास्पद वक्तव्य केले होते. आज नरेंद्र महाराज स्वतः मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात वडेट्टीवार यांची तक्रार देणार आहेत. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे नरेंद्र महाराजांसोबत उपस्थित राहणार आहे. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. आज नरेंद्र महाराजांच्या अनुयायांकडून वडेट्टीवारांविरोधात राज्यभर तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत.

Vijay Wadettiwar
Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वारकर्‍यांची एन्ट्री, अन्न त्याग आंदोलनाबाबत घेतला मोठा निर्णय

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी विजय वडेट्टीवर यांच्याविरोधात विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वडेट्टीवार यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन केले जात आहे. नाशिक, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक शहरात वडेट्टीवार यांच्याविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.

Vijay Wadettiwar
Accident : भल्या पहाटे कार डिव्हायडरला धडकली, CNG चा स्फोट, पोलिस अधिकाऱ्यासह २ जणांचा होरपळून मृत्यू, जामखेड हादरलं!

पुण्यात वडेट्टीवारांचा जाहीर निषेध -

जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्याबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा जाहीर निषेध करण्यासाठी पुण्यात आंदोलन कऱण्यात येत आहे. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. नरेंद्राचार्य महाराज यांचे अनुयायी जिल्हाधिकारी कार्यलयाबाहेर जमले आहेत. विजय वडेट्टीवार याच्या फोटोला जोडो मारत आंदोलन केलं जातं आहे.

मुंबईत जोडो मारो आंदोलन -

विजय वडेट्टीवारांविरोधात नरेंद्र महाराजांचे मुंबई येथील अनुयायी आक्रमक झाले आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनुयायांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. अनुयायांकडून विजय वडेट्टीवारांविरोधात निदर्शने सुरू आहेत. नरेंद्र महाराज यांच्या अनुयायांकडून वडेट्टीवार यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे.

नाशिक-संभाजीनगरातही आंदोलन -

नाशिकमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात नरेंद्र महाराजांच्या अनुयायांकडून आंदोलन करण्यात येत आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. विजय वडेट्टीवार यांनी साधू महंतांचा एकेरी उल्लेख केल्याच्या निषेधार्थ नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी आंदोलन पुकारले आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून नरेंद्र महाराजांच्या संदर्भात अपमानास्पद वक्तव्य करण्यात आल्याने नरेंद्र स्वामी यांच्या भक्त परिवाराने नाराजी व्यक्त केली. विजय वडे्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

माफी मागण्याची मागणी

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे अनुयायांमध्ये मोठा संताप आहे. वडेट्टीवर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. वडेट्टीवार यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी संतप्त अनुयायांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com