
भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
सरपंच हत्येशी संबंधित प्रकरणी मकोकांतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडभोवती चौकशीचा फास आवळला जात असतानाच दुसरीकडे फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी अशोक मोहिते या तरुणाला जीवघेणी मारहाण केलीय. त्यामुळे हे प्रकरण आणखीच तापलंय. तर फरार आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी आणि आकाच्या गँगचा माज उतरवण्यासाठी धसांनी आकाच्या नार्को टेस्टची मागणी केलीय.
सरपंच हत्येला दोन महिने उलटून गेले आहेत.. तर या प्रकरणात आतापर्यंत वाल्मिक कराडसह 8 आरोपींना अटक करण्यात आलीय. मात्र अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांना गुंगारा देतोय.. त्यामुळे कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आलीय.. मात्र आरोपींकडून सत्य जाणून घेण्यासाठी वापरण्यात येत असलेली नार्को टेस्ट नेमकी कशी करण्यात येते? पाहूयात.
कशी करतात नार्को टेस्ट?
- नार्को टेस्टमध्ये सायको अॅक्टिव्ह या ट्रुथ ड्रग्जचा वापर.
- सोडियम पेंटोथलपासून या इंजेक्शनची निर्मिती.
- हे ड्रग्ज दिल्यानंतर आरोपी संमोहित होतो.
- आरोपीचं आत्मभान आणि कल्पनाशक्ती थांबते.
- या स्थितीत आरोपीला खोटं बोलणं अवघड जातं.
- तज्ज्ञांच्या देखरेखीखाली नार्को टेस्ट केली जाते.
वाल्मिक कराडने पुण्यात शरणागती पत्करल्यानंतर त्याच्या नार्को टेस्टची मागणी करण्यात येत होती. मात्र कराडच्या शरणागतीला महिना उलटून गेल्यानंतरही त्याची नार्को टेस्ट करण्यात आली नाही. याऊलट प्रशासनाकडून कराडचे लाड पुरवले जात असल्याचा आरोप सत्ताधारी आणि विरोधकांकडून कऱण्यात येत होता. मात्र आता भाजप आमदार सुरेश धसांनीच कराड आणि त्याच्या साथीदारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केलीय. त्यामुळे प्रशासन धसांची मागणी मान्य करुन सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा छडा लावणार की धसांची मागणी धुडकावून कराडचे लाड पुरवत राहणार? याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.