Eknath Shinde : 'नीलम गोऱ्हेंनी काळे धंदे बाहेर काढल्याने उद्धव ठाकरेंना मिरच्या..' एकनाथ शिंदे यांच्याकडून खणखणीत प्रत्युत्तर

DCM Eknath Shinde : नीलम गोऱ्हेंना केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंधेरीतल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.
Eknath shinde
Eknath shinde Saam Tv
Published On

Eknath Shinde Statement : नीलम गोऱ्हे दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील व्यासपीठावरुन एक वाक्य बोलल्या. ते काहीजणांना प्रचंड झोंबले. 'गोऱ्हेंनी काळे धंदे बाहेर काढल्याने त्यांना मिरच्या लागल्या, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. अंधेरी येथे शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी आयोजित केलेल्या लाडक्या बहिणींच्या आभार मेळावा सभेत ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'नीलम गोऱ्हे त्यांच्याबाबत आताच बोलल्यात असे नाही, यापूर्वी अनेक लोक बोलले आहेत. राज ठाकरे बोलले, त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात. नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे, निलेश राणे देखील यापूर्वी बोलले आहेत. मात्र नीलम गोऱ्हे बोलल्या. त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे तुम्हाला शोभत नाही. त्या खरे बोलल्या. आमची देना बँक आहे आणि समोर लेना बँक आहे.

Eknath shinde
Mahashivratri 2025 : 'नमः पार्वती पतये हर हर महादेव'चा अर्थ तुम्हाला माहितीये का?

'नीलम ताई जे बोलल्या ते कटुसत्य आहे. महिलांवर अत्याचार झाल्यास पहिल्या धावून जाणाऱ्या नीलमताई होत्या. शक्ती विधेयकामध्ये नीलमताईंचे योगदान मोठं आहे. जे चांगल काम करतात त्यांना बदनाम कसं करायची ही पोटदुखी आहे. तुम्ही डॉक्टरकडून नाही तर कंपाऊंडरकडून औषध घेत असल्याने पोटदुखी बरी होत नाही', अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

Eknath shinde
मोठी बातमी! OBC, VJNT आणि NT संवर्गातील जात पडताळणी होणार गतिमान, फडणवीस सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

ते पुढे म्हणाले की, 'प्रयागराज येथे काल गंगा, यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमावर स्नान केले. माझ्या लाडक्या बहिणींवर मायेची पाखर ठेव आणि असाच आशिर्वाद कायम ठेव, लाडक्या बहिणींची सेवा करण्याची अशीच संधी आम्हाला मिळत राहो, अशी प्रार्थना गंगा मातेला केली. लाडक्या बहिणींची योजना गेम चेंजर नाही तर लाईफ चेंजर आहे.

Eknath shinde
Pandharpur News : विठुरायाच्या मंदिराला चांदीचा दरवाजा, ३० किलो चांदीत कोरीव काम, भक्तांनी दिलं दान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com