मोठी बातमी! OBC, VJNT आणि NT संवर्गातील जात पडताळणी होणार गतिमान, फडणवीस सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Maharashtra Latest News : तीन वर्षांपासून रखडलेल्या प्रकरणासंबंधित निर्णय आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. त्यांनी राज्यातील ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देवून त्यांची ठिकठिकाणी नेमणूक केली.
fadnavis government
fadnavis governmentX (Twitter)
Published On

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यातील ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देवून त्यांची पदस्थापना करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे. या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती विविध कारणांमुळे प्रलंबित होती. दरम्यान या अधिकाऱ्यांपैकी २९ अधिकाऱ्यांची जात पडताळणी समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

महसूल विभागातील सेवाजेष्ठता यादी जानेवारी २०२२ मध्ये प्रसिद्ध झाली. अनेक कारणांमुळे ही यादी ३ वर्ष प्रलंबित होती. आज ही निवड यादी आणि ६० अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. त्यास त्यांची नेमणूकही करण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अतिरिक्त ६० जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना बावनकुळे यांनी त्यातील २९ अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय जात पडताळी समितीचे अध्यक्ष म्हणून नेमले आहे. जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांची ही २९ पदे काही वर्षांपासून रिक्त होती. तेथे आज नेमणूक झाल्याने समितीच्या कामकाजाला गती मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एन टी संवर्गातील जात पडताळणीची अनेक प्रकरणे तातडीतने मार्गी लागतील अशी आशा आहे.

fadnavis government
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय चाललंय? जयंत पाटील-बावनकुळे भेटीमागील इनसाइड स्टोरी

६० अधिकाऱ्यांची नेमणूक करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यार्थी वर्गासह सामाजिक आरक्षण घेवून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना आणि नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. बावनकुळेंच्या निर्णयामुळे राज्यातील सर्वच जात पडताळणी समितींना अध्यक्ष मिळाले आहेत.

fadnavis government
Pandharpur News : विठुरायाच्या मंदिराला चांदीचा दरवाजा, ३० किलो चांदीत कोरीव काम, भक्तांनी दिलं दान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com