Uddhav Thackeray : 'धक्कापुरुष' ठाकरेंची नवी रणनीती, फुटणाआधीच नेत्याची होणार हकालपट्टी? पाहा स्पेशल रिपोर्ट

Uddhav Thackeray Shivsena : उद्धव ठाकरेंनी आता पक्षाला लागलेल्या गळतीवर नामी उपाय शोधून काढलाय. नेता फुटण्यापूर्वीच आता ठाकरेंना सर्वात आधी कळणार आहे. नेमकी काय आहे ही रणनीती? यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam Tv
Published On

विधानसभा निवडणूकांच्या निकालात विरोधकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र तितकीच मोठी गळती ठाकरेंच्या शिवसेनेला सध्या लागलीये. धक्क्यावर धक्के सध्या शिवसेनेत बसत असल्यानं मी सध्या धक्का पुरुष झाल्याचं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय.

तीन माजी आमदारांसह कोकणात राजन साळवींनी शिवसेना सोडली तर मुंबईत ठाकरेंचे अत्यंत विश्वासू जितेंद्र जनावळेंनी मातोश्रीसमोर नतमस्तक होत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता ठाकरेसोबत राहणारे अनेक आमदार आणि खासदार शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.

त्यामुळे धक्के खाण्यापेक्षा धक्के देण्याच्या तयारीत असणाऱ्यांना धक्के देऊन पक्षाबाहेर काढण्याची ठाकरेंनी रणनिती आखलीये. आणि म्हणूनच संभाव्य फुटीरांवर नजर ठेवण्यासाठी ठाकरेंनी नेते आणि उपनेत्यांचं एक गुप्तहेर पथक तयार करणार असल्याचं कळतंय.

उद्धव ठाकरेंचं गुप्तहेर पथक?

- नेते आणि उपनेत्यांचे गुप्तहेर पथक

- गुप्तहेर पथक ठेवणार संभाव्य फुटीरांवर नजर

- फुटणाऱ्या नेत्याची माहिती थेट उद्धव ठाकरेंना देणार

- फुटण्यापूर्वीच ठाकरे संबंधितांची पक्षातून हकालपट्टी करणार

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : मी 'धक्कापुरुष'! राजकीय धक्क्यांची तुलना उद्धव ठाकरेंनी जपानच्या भूकंपाशी केली, नेमकं काय म्हणाले?

२०१९ नंतर महाराष्ट्राचं राजकारण १८० अंशात बद्ललं. राजकीय पक्षांमध्ये अनेक आघाड्या निर्माण झाल्या. मात्र एखाद्या पक्षात पहिल्यांदाच गुप्तहेर आघाडी निर्माण केल्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच पंचायत झाल्याची चर्चा राजकीय विश्वात रंगलीय.

Uddhav Thackeray
Chhaava : छत्रपती संभाजी महाराजांचा 'छावा' फ्रीमध्ये एक लाख नागरिकांना दाखवणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com