Uddhav Thackeray: राम मंदिर देणगी घोटाळ्याविरोधात ठाकरे आक्रमक, रविवारी हनुमान मंदिरात रामरक्षा आंदोलन

Shiv Sena UBT: उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर दादरच्या हनुमान मंदिरासमोर आंदोलनाची घोषणा केली आहे. शिवसेनेतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रामभक्त आणि नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysaam tv
Published On

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठी राजकीय घडामोड घडली. पक्षातील तब्बल सहा खासदारांनी साथ सोडल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. याच काळात शिवसेना नेते सचिन आहिर यांनीही ठाकरेसेनेची साथ सोडली आहे. त्यांना शिंदेगटाकडून नुकतंच विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी मिळालीये.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा करत राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आंदोलन छेडण्याचा निर्णय जाहीर केलाय. दादरच्या हनुमान मंदिरासमोर या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

Uddhav Thackeray
'ऑपरेशन टायगर' पुन्हा ॲक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्याने अचानक सोडली साथ; राजकीय वर्तुळात खळबळ

रविवारी सायंकाळी आंदोलनाची सुरुवात

उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, रविवारी 5 तारखेला सायंकाळी 4 वाजता आंदोलनाला सुरुवात केली जाईल. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, आज देशात भाजपची सत्ता आहे आणि त्या सत्तेचा पाया राम मंदिर आंदोलनात आहे. राम मंदिरासाठी जे आंदोलन झालं त्यामध्ये शिवसैनिकांसह देशभरातील अनेक हिंदूंनी सहभाग घेतला होता. त्या काळातील अनेक घटना आणि आंदोलनाची चित्रं आजही लोकांच्या मनात कायम आहेत.

ते पुढे म्हणाले की, गोध्रा, अहमदाबादमधील दंगल आणि मुंबईतील बॉम्बस्फोट अशा अनेक घटना त्या काळात घडल्या. त्या काळात हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर त्रास सहन केलाय. या सर्व घटनांचं राजकीय भांडवल करून भाजपने आपली ताकद वाढवली. राम मंदिराचा मुद्दा हाती घेण्यापूर्वी भाजपचे केवळ दोन खासदार होते, असंही त्यांनी म्हटले.

Uddhav Thackeray
'ऑपरेशन टायगर'चा पेपर मातोश्रीवर कसा फुटला? इनसाईड स्टोरी समोर; खासदाराच्या वडिलांचा सर्वात मोठा खुलासा

गांधीवादी समाजवाद सोडून राम मंदिराचा मुद्दा स्वीकारला

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करत म्हटलंय की, एकेकाळी गांधीवादी समाजवादाचा विचार मांडणाऱ्या पक्षाने तो विचार बाजूला ठेवत राम मंदिराचा मुद्दा स्वीकारला. देशात आमदार आणि खासदार फोडण्याचे प्रकार सुरू आहेत आणि त्याला वेगवेगळी नावं दिली जातायत. आता "ऑपरेशन राम मंदिर" सुरू आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ठाकरे म्हणाले की, या प्रकरणातील बातम्या सर्व माध्यमांमध्ये दिसत असतील किंवा नसतील पण मंदिरात चोरी होत असल्याचा आरोप केला जातोय. राम मंदिरावरच दरोडा टाकला जातोय. काहींच्या मते, या पैशाचा वापर इतर पक्षांतील लोकांना फोडण्यासाठी केला जात असल्याचीही चर्चा आहे.

Uddhav Thackeray
Navi Mumbai: मुंबई-डोंबिवलीचा प्रवास फक्त १५ मिनिटांत, ऐरोली-काटई उन्नत मार्ग या दिवशी होणार सुरू, वाचा महत्त्वाची अपडेट

"अब हिंदू माफ नहीं करेगा"

उद्धव ठाकरे यांनी 1990 च्या दशकाचा उल्लेख करत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, त्या काळात वाजपेयी म्हणाले होते, "अब हिंदू मार नहीं खायेगा." आता मी म्हणतो, "अब हिंदू माफ नहीं करेगा."

जे कोणी मंदिरांची लूट करत असतील मग ते भाजपचे असोत किंवा इतर कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांना हिंदू माफ करणार नाहीत. योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल आणि त्याची सुरुवात आपण या आंदोलनातून करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.

दादरच्या हनुमान मंदिरासमोर होणार आंदोलन

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी दादर येथील कबुतरखान्याजवळ असलेल्या हनुमान मंदिरासमोर हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व रामभक्त आणि हिंदूंना निमंत्रण दिलंय. भाजपच्या कार्यकाळात हिंदुत्व धोक्यात आल्याचं ज्यांना वाटतं, तसंच मंदिरातील कथित चोरीचा निषेध करणाऱ्या प्रत्येकाने या आंदोलनात सहभागी व्हावं, असं त्यांनी आवाहन केलंय.

मी स्वतः या आंदोलनात उपस्थित राहणार आहे. शिवसैनिक, पक्षाचे नेते, रामभक्त आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर विश्वास ठेवणारे सर्वजण या आंदोलनात सहभागी व्हावेत. अशा सर्वांचं आम्ही स्वागत करू, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com