'ऑपरेशन टायगर' पुन्हा ॲक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्याने अचानक सोडली साथ; राजकीय वर्तुळात खळबळ

Uddhav Thackeray Latest News : उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. उत्तर महाराष्ट्रातील या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam Tv
Published On

Shubhangi Patil joins Eknath Shinde Shiv Sena : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'ऑपरेशन टायगर' पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाले असून खासदार फुटीच्या धक्क्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा सुरुंग लागला आहे. ठाकरे सेनेच्या धडाडीच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

शुभांगी पाटील या धुळ्यावरून आपल्या हजारो समर्थकांसह आणि कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर पक्षप्रवेश पार पडणार आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. उत्तर महाराष्ट्रात शुभांगी पाटील यांचे वजन आहे.

Uddhav Thackeray
Pune : मुसळधार पावसात भयंकर घटना, पुण्यात खड्ड्यात बुडून २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, नेमकं झालं काय?

"उद्धव ठाकरेंवर नाराजी नाही, पण..."

पक्षप्रवेशासाठी निघण्यापूर्वी 'साम टीव्ही'चे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी शुभांगी पाटील यांच्याशी एक्स्क्युसिव्ह बातचीत केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "माझी उद्धव ठाकरे साहेबांवर वैयक्तिक कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. परंतु, माझ्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विकासासाठी शिंदे सेनेत जाण्याचा प्रचंड आग्रह धरला. कार्यकर्त्यांच्या याच आग्रहास्तव आणि भविष्यातील कामांसाठी मी हा निर्णय घेत आहे."

Uddhav Thackeray
Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल खून प्रकरणात बीड कनेक्शन; नव्या ट्विस्टने पुण्यात खळबळ

ठाकरेंना उत्तर महाराष्ट्रात मोठा धक्का

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून शुभांगी पाटील या उत्तर महाराष्ट्रात ठाकरे सेनेचा एक मोठा आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांना उपनेतेपदही देण्यात आले होते. मात्र, आता त्यांनीच थेट शिंदे गटाची वाट धरल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात ठाकरे सेनेला भगदाड पडले असून, एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना दिलेला हा धक्का राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Uddhav Thackeray
शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! माती-मुरूमासाठी आता १ रुपयाही मोजावा लागणार नाही; त्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com