Nashik News : नाशिकमध्ये घराचं बांधकाम करताना भिंत कोसळली; दोन कामगार ठार

nashik wall collapse : नाशिकमधून मोठी बातमी हाती आली आहे. नाशिकमध्ये घराचं बांधकाम करताना भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.
Nashik News : नाशिकमध्ये घराचं बांधकाम करताना भिंत कोसळली; दोन कामगार ठार
nashik wall collapse Saam tv
Published On

तबरेज शेख, नाशिक

Nashik News:

नाशिकमधून मोठी बातमी हाती आली आहे. नाशिकमध्ये घराचं बांधकाम करताना भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. नाशिकमधील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या गंगापूर रोड भागातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. या भागात भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नवीन घराचं बांधकाम सुरु आहे. या घराचं बांधकाम सुरु असताना भिंत कोसळल्याची घटना घडली. या दुर्देवी घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. सोमवारी ही घटना घडली. नव्या घराची भिंत कोसळल्याने या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे.

Nashik News : नाशिकमध्ये घराचं बांधकाम करताना भिंत कोसळली; दोन कामगार ठार
Crime News: पुणे हादरलं! कर्जबाजारी तरुणांनी मैत्रिणीचं अपहरण करून केला खून; मृतदेह जाळुन पुरला शेतात

ही दुर्घटना घडल्यानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांकडून तातडीने जखमींवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. गंगापूर रोड भागातील या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

Nashik News : नाशिकमध्ये घराचं बांधकाम करताना भिंत कोसळली; दोन कामगार ठार
Crime News: पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे; नंतर गुगलवर सर्च केलं बायको मृत्यूचे फायदे काय?

घटनास्थळी नेमकं काय घडलं?

नाशिकच्या गंगापूर रोड येथील सावरकर येथे भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर या घटनेत दोघे गंभीर जखमी आहेत. सध्या त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या घराचे काम सुरू असताना अपघात घडला आहे.

सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान इमारतीच्या पाया भरणीसाठी बांधली जाणारी भिंत कोसळल्याने हा अपघात झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघाताच्या संदर्भात गंगापूर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com