Accidnet News: दोन भरधाव दुचाकींच्या धडकेत २ जणांचा जागीच मृत्यू, सोयगाव तालुक्यात भीषण अपघात

Bike Accident At Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात भीषण दुचाकी अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
Accidnet
Accidnet Saam Tv

रामनाथ ढाकणे साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात भीषण दुचाकी अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. सोयगाव तालुक्यातील वरठण- तिडका रस्त्यावर ही घटना (Bike Accident At Chhatrapati Sambhajinagar) घडलेली आहे. दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या वरठाण तिडका रस्त्यावर दोन दुचाकींचा भीषण अपघात (Bike Accident) झालाय. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 2 जण गंभीर जखमी आहे. दरम्यान हा अपघात झाल्यानंतर जवळपास पाऊण तास रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले (Chhatrapati Sambhajinagar News) होते.

सुनील विक्रम बागुल आणि काशिनाथ विठ्ठल पाटील, असं या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं (Varathan- Tidka Road) आहे. तर राहुल त्र्यंबक पाटील आणि सतीश सखाराम मोरे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख आणि त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी (Road Accident) हजर झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.

Accidnet
Tamilnadu Accident CCTV Footage: भरधाव रस्त्यावर धावणारी कार हवेत उडाली अन् तीन वेळा उलटली, CCTV फुटेज व्हायरल

काशिनाथ पाटील आणि राहुल पाटील हे दोघेजण दुचाकीने पाचोरा तालुक्यातील पिंपरी येथून किनीकडे जात होते तर याचवेळी सोयगाव तालुक्यातील (Soygaon Taluka) सुनील बागुल आणि सतीश मोरे हे दुसऱ्या दुचाकीने वाडी येथून तिडकाकडे निघाले होते. त्यांची वरठण- तिडका रस्त्यावर धडक झाली. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर दोघेजण गंभीर जखमी (Accident) झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. वाहनांचा भरधाव वेग हे अपघातांचं प्रमुख (Chhatrapati Sambhajinagar News) कारण असल्याचं दिसत आहे. अनेकदा खराब रस्त्यांमुळे देखील वाहनांता अपघात होत असल्याचं दिसतं.

Accidnet
Manmad Malegaon Highway Accident News : मनमाड-मालेगाव महामार्गावर बसला अपघात; 50 प्रवासी जखमी, दहा वर्षाचा मुलगा बचावला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com