तुमसर बाजार समिती निवडणुक निकाल: भाजप- शरद पवार गटाच्या संयुक्त पॅनेलचे वर्चस्व

tumsar krushi utpanna bazar samiti election result : तुमसर बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार याची उत्सुकता शेतक-यांसह नागरिकांना लागून राहिली हाेती.
tumsar krushi utpanna bazar samiti election result
tumsar krushi utpanna bazar samiti election resultSaam Digital
Published On

- शुभम देशमुख

भंडारा जिल्ह्यातील तुमसर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप- राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. या बाजार समितीमधील १८ पैकी ११ संचालक या गटाचे निवडून आले आहेत. तुमसर बाजार समितीचा निवडणुकीचा निकाल काय लागणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली हाेती. (Maharashtra News)

बहुप्रतिक्षित तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल आज (साेमवार) घोषित झाला. तब्बल अडीच वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संयुक्त बळीराजा जनहित पॅनलनं निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.

tumsar krushi utpanna bazar samiti election result
Lok Sabha Election 2024: आधी चंद्रपूरला आता तेलंगणात बजावणार मतदानाचा हक्क, एकाच निवडणुकीत दोनदा मतदान, ते कसं बरं?

बळीराजाचे ११ संचालक निवडून आणलेत. ही निवडणुक १८ संचालक पदासाठी झाली हाेती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे आणि भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

tumsar krushi utpanna bazar samiti election result
Parbhani Water Crisis News: चिंताजनक! हंडाभर पाण्यासाठी माेजावे लागताहेत पैसे, पेडगावकरांचा ग्रामपंचायतीवर माेर्चा

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com