तुकाराम मुंढेंचा Dominos ला मोठा दणका! 3 आउटलेटचे परवाने निलंबित; मोठी खळबळ

Domino's Mumbai outlets licence suspended By FDA: मुंबईतील डोमिनोजच्या विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपर येथील तीन आस्थापनांवर FDAने कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा, स्वच्छता, साठवणूक आणि Pest Control नियमांचे उल्लंघन आढळल्याने अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले.
Domino's Mumbai outlets licence suspended by FDA
Domino's Mumbai outlets licence suspended by FDAsaam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध Domino’s Pizzaच्या तीन आस्थापनांवर तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी कारवाई केली आहे. विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम येथील Domino’s Pizza आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

FDAच्या आदेशानुसार, या तीनही आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसाय परवाना व नोंदणी) विनियम, २०११ मधील परिशिष्ट-४ (Schedule-4) मधील तरतुदींचे उल्लंघन आढळून आले. त्यामुळे संबंधित आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

विलेपार्ले शाखेत स्वच्छता व साठवणुकीबाबत त्रुटी

विलेपार्ले पश्चिमेतील एस. व्ही. रोडवरील Domino’s Pizza आस्थापनाच्या तपासणीत FSSAI Licenseचे प्रदर्शन, potable water testing, food storage, pest control आणि hygiene facilities याबाबत त्रुटी आढळल्या.

Frozen Food तसेच इतर अन्नपदार्थ योग्य तापमानावर साठवणे आणि त्याचे नियमित Temperature Monitoring करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच Food Preparation Areaमध्ये स्वच्छता राखणे आणि Food व Non-Food वस्तूंचे योग्य विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Domino's Mumbai outlets licence suspended by FDA
Pune : FDA ची मोठी कारवाई! पुण्यासह महाराष्ट्रातील १० बेकरी, रेस्टॉरंट आणि कॅन्टीनचे परवाने निलंबित

किचनमधील दरवाजा, फरशी आणि Chilling Roomमध्ये आवश्यक दुरुस्ती करून Rodents आणि Pestsचा प्रवेश रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. Food Preparation, Equipment Sanitization आणि कर्मचाऱ्यांसाठी Hand-Washing व Hygiene Facilities उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे.

Domino's Mumbai outlets licence suspended by FDA
Pune : FDA ची मोठी कारवाई! पुण्यासह महाराष्ट्रातील १० बेकरी, रेस्टॉरंट आणि कॅन्टीनचे परवाने निलंबित

बोरिवली शाखेत 54 टक्के Non-Compliance

बोरिवली पश्चिमेतील आय.सी. कॉलनी परिसरातील Domino’s Pizza आस्थापनाच्या तपासणीत Schedule-4च्या तरतुदींचे उल्लंघन आढळून आले असून एकूण 54 टक्के गुणांसह Non-Compliance नोंदवण्यात आले.

अन्न साठवणूक, Temperature Monitoring, Food Testing, स्वच्छता आणि Pest Control यामध्ये आवश्यक सुधारणा करण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कच्चे व बिगर-अन्न पदार्थ स्वतंत्रपणे ठेवणे तसेच कच्चे आणि शिजवलेले, शाकाहारी आणि मांसाहारी अन्न यांचे योग्य Segregation करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच उपकरणे व भांडी योग्य पद्धतीने स्वच्छ व Sanitise करणे आणि Pizza व Food Preparation Areaमधील तेलकटपणा व Food Residue तातडीने दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Domino's Mumbai outlets licence suspended by FDA
Pune : पुण्यातील पेठाही आता FDA च्या रडारावर, अनेक मिठाईच्या दुकानावर छापा; ५ हॉटेलचे परवाने रद्द

R-City Mallमधील शाखेतही नियमभंग

घाटकोपर पश्चिमेतील R-City Mallमधील Domino’s Pizza आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवानाही निलंबित करण्यात आला आहे. या ठिकाणी स्वच्छता व Sanitationची योग्य व्यवस्था नसणे तसेच Cleaning & Sanitation Schedule उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले. तपासणीदरम्यान कीटकांचा प्रादुर्भाव आढळून आल्याचे तसेच प्रभावी Pest Control उपाययोजना आणि त्यासंबंधी नोंदी उपलब्ध नसल्याचे आदेशात नमूद आहे. अन्न साठवणुकीत FIFO/FEFO पद्धतीचे पालन आणि योग्य तापमान नियंत्रण नसल्याचेही निदर्शनास आले.

याशिवाय अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या साहित्यांचे Food Grade Certificate, Calibration, Preventive Maintenance, Food/Water Testing Reports आणि इतर आवश्यक Food Safety Records उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. Food Handlersच्या वैयक्तिक स्वच्छतेसह वैद्यकीय तपासणी, लसीकरण, Gloves आणि Apronsच्या वापराबाबत योग्य पालन व नोंदी नसल्याचेही आदेशात नमूद आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले. FDAच्या कारवाईमुळे मुंबईतील या तीन Domino’s आस्थापनांच्या अन्न सुरक्षा आणि स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित त्रुटींची पूर्तता करून नियमांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com