Pune : पुण्यातील पेठाही आता FDA च्या रडारावर, अनेक मिठाईच्या दुकानावर छापा; ५ हॉटेलचे परवाने रद्द

FDA Pune : पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत संशयित निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त केला. पुण्यातील पाच हॉटेलांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
FDA raid on sweet shops in Pune latest news
FDA raid on sweet shops in Pune latest newsSaam TV Marathi
Published On

FDA raid on sweet shops in Pune latest news : पुण्यातील पेठांमधील प्रसिद्ध मिठाईच्या दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक छापे टाकत मोठा बडगा उचलला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही धडक कारवाई करण्यात आली असून, या मोहिमेदरम्यान शहरातील ५ प्रमुख हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, एफडीएने कारवाईचा हा धडाका केवळ पुण्यापुरताच मर्यादित न ठेवता आता सातारा आणि सांगली जिल्ह्यांतही आपली तपासणी मोहीम तीव्र केली आहे.

अन्नातील भेसळ, निकृष्ट दर्जा आणि अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात मोठी कारवाई करून ४ दिवसांत ४५ लाख ७० हजार १६८ रुपयांचा संशयित निकृष्ट, असुरक्षित आणि चुकीच्या लेबलिंगचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. यासह पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात देखील कारवाई करत कुल्फी उत्पादन केंद्राच परवाना रद्द करण्यात आला आहे

FDA raid on sweet shops in Pune latest news
Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सोशल मीडिया वापरावर निर्बंध, जाणून घ्या काय आहेत नवे नियम

FDA ने २४ ते २७ जुलैदरम्यान राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत पुणे शहरातील गणेश पेठ व नाना पेठ परिसरातील घाऊक व्यापाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले. तपासणीदरम्यान मिठाई, कँडी, चॉकलेट, सुका मेवा, मसाले, फरसाण आदी अन्नपदार्थ संशयित निकृष्ट, असुरक्षित, चुकीच्या लेबलिंगचे किंवा परवान्याशिवाय साठविल्याचे आढळले. त्यानंतर संपूर्ण साठा जप्त करून नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

FDA raid on sweet shops in Pune latest news
मोठी बातमी! मनोज जरांगेंची निर्णायक आंदोलनाची घोषणा, तारीखही सांगितली, फडणवीसांना काय दिला इशारा?

तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात बनावट, भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात व्यापक मोहीम उघडली आहे. सणासुदीचे दिवस असोत वा दैनंदिन व्यवहार, नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या बेकायदेशीर अन्न व्यावसायिकांवर एफडीएने धडक कारवाईचा बडगा उचलला आहे. मिठाईची दुकाने, हॉटेल्स, दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादक आणि खाद्यतेल विक्रेत्यांवर राज्यभरात जागोजागी छापे टाकून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांचे परवाने निलंबित केले जात आहेत. दूषित अथवा भेसळयुक्त अन्नपदार्थांचे साठे जप्त करून ते नष्ट करण्यासोबतच, गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्याने राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com