मोठी बातमी! मनोज जरांगेंची निर्णायक आंदोलनाची घोषणा, तारीखही सांगितली, फडणवीसांना काय दिला इशारा?

Manoj Jarange, Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी निर्णायक आंदोलनाची घोषणा केली आहे. नोंदी सापडूनही लाखो मराठा समाजबांधवांना प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली.
Manoj Jarange August 29 protest latest news
Manoj Jarange August 29 protest latest newsSaam TV marathi
Published On

Manoj Jarange August 29 protest latest news : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी २९ ऑगस्ट रोजी 'शेवटचे आणि निर्णायक आंदोलन' करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे. "या आंदोलनात एकतर मी जाईन, नाहीतर ते जातील," असा थेट इशारा देत जरांगे यांनी सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे.

सरकार मराठा समाजाला वेड्यात काढतंय

अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. ते म्हणाले, मराठा समाजात ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तरीही सरकार पात्र मराठ्यांना प्रमाणपत्रे का देत नाही? मराठा समाजाला वेड्यात काढण्याचे काम सध्या सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाज सातत्याने संघर्ष करत आहे, मात्र सरकारकडून केवळ आश्वासनं दिली जात आहेत.

Manoj Jarange August 29 protest latest news
अरे बापरे! लग्नाच्या २५ दिवसांनंतर पत्नी दाढी करताना दिसली अन् पतीच्या पायाखालची जमीनच सरकली, पुढे काय घडलं?

फडणवीसांना थेट सवाल

मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांनी थेट संवाद विचारला. ते म्हणाले, फडणवीस साहेब, हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे का मिळत नाहीत? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. नोंदी सापडूनही प्रमाणपत्रे नाकारली जात असल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Manoj Jarange August 29 protest latest news
Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सोशल मीडिया वापरावर निर्बंध, जाणून घ्या काय आहेत नवे नियम

२९ ऑगस्टला आंदोलनाला ३ वर्षे पूर्ण

२९ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलनाला तब्बल तीन वर्षे पूर्ण होत आहेत. याच दिवसाचे औचित्य साधून या संघर्षाचा शेवट करण्यासाठी अखेरचे आणि निर्णायक आंदोलन पुकारण्यात आले आहे. तीन वर्षांच्या दीर्घ लढ्यानंतर आता सरकारची कोणतीही दिशाभूल खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com