

नागपूरमध्ये बुलेटवर स्टंट करताना भीषण अपघात झाला
या अपघातामध्ये दोन कबड्डीपटूंचा जागीच मृत्यू झाला
बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना
बुलेटवरील नियंत्रण सुटल्याने ती पिलरला जोरदार धडकली
नागपुरमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. नागपूरच्या बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत काचीपुरा परिसरात ही अपघाताची घटना घडली. अपघातामध्ये मृत्यू झालेले दोन्ही तरुण १९ वर्षांचे होते. दुचाकी चालवत असताना दोघेही स्टंट करते होते. चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पिलरला धडकली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोन्ही तरुणांनी जागीच प्राण सोडले.
मिळालेल्या माहितीनुसार, युग विशाल चनकापूरे (१९ वर्षे) आणि रूद्र शशिकांत सोमकुंवर (१९ वर्षे) असं अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांची नावं आहेत. दोघेही नागपूरच्या काचीपुरा परिसरात राहणारे होते. दोघेही कबड्डीपटू असल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री उशिरा युग आणि रुद्र दुचाकी चालवताना स्टंट करत होते. दुचाकी सुसाट चालवत असताना भयंकर अपघात झाला.
वर्धा मार्गावरील जनता चौक ते बजाजनगर चौकदरम्यान बुलेटवरून स्टंटबाजी करणं दोघांच्या जीवावर बेतले. ते दुचाकी सुसाट चालवत होते. 'विष्णूजी की रसोई'समोर एका महिला दुचाकीस्वाराला कट मारताना बुलेट चालकांचा ताबा सुटला. त्यानंतर बुलेट थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पिलरवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये दोघे गंभीर जखमी झाले.
या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. स्थानिक नागरिकांनी युग आणि रूद्र या दोघांना गंभीर जखमी अवस्थेत तातडीने रामदासपेठेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्यांना मृत घोषित केले. बजाजनगर पोलिस पुढील तपास करत आहेत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.