Accident: भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, अपघातामध्ये सरपंचाचा जागीच मृत्यू

Amravati Accident : अमरावतीमध्ये भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये सरपंचाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Accident: भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, अपघातामध्ये सरपंचाचा जागीच मृत्यू
Amravati Accident Saam Tv
Published On

Summary -

  • अमरावतीत भीषण अपघातामध्ये सरपंचाचा मृत्यू झाला

  • कुऱ्हा–तिवसा रोडवर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक

  • वाढोना गावचे सरपंच प्रशांत हुडे यांचा जागीच मृत्यू

  • अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे

अमरावतीमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा- तिवसा रोडवर हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ते सरपंच होते. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चुराडा झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रक चालक फरार झाला. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा- तिवसा रोडवर दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून जाणारे दोघे जण रस्त्यावर फेकले गेले. दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे एकाने जागेवरच प्राण सोडले. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव प्रशांत हुडे असून ते वाढोना गावचे सरपंच होते.

Accident: भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, अपघातामध्ये सरपंचाचा जागीच मृत्यू
Accident : मध्यरात्री हायवेवर मृत्यूचं तांडव, लग्नाहून आलेली कार आधी डिव्हायडरला धडकली मग....; ६ जणांचा मृत्यू

प्रशांत हुडे धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाढोना गावचे सरपंच होते. तसंच ते धामणगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देखील होते. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या एकाला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मृत्यू झालेल्या प्रशांत हुडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. प्रशांत हुडे यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या वाढोना गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताचा तपास सध्या पोलिस करत आहेत. फरार ट्रकचालकाचा शोध घेतला जात आहे.

Accident: भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, अपघातामध्ये सरपंचाचा जागीच मृत्यू
Accident : ५ मित्र देवदर्शनाला निघाले, पण वाटेतच काळाचा घाला, परभणीत मध्यरात्री भयंकर अपघात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com