Salim Khan: सलमान खानच्या वडिलांची प्रकृती बिघडली, लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

Salim Khan Hospitalised: बॉलिवूडचा 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानचे वडील सलीन खान यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Salim Khan: सलमान खानच्या वडिलांची प्रकृती बिघडली, लीलावती रुग्णालयात उपचार सुरू
Salim Khan Hospitalised Saam Tv
Published On

Summary -

  • सलीम खान यांची प्रकृती अचानक बिघडली

  • मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

  • सलमान खान रुग्णालयात दाखल झाला

  • रुग्णालयात दाखल करण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उपारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९० वर्षीय सलीम खान यांची प्रकृती मंगळवारी सकाळी अचानक बिघडली. त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. पण त्यांना नेमकं काय झालं आणि त्यांच्या तब्येतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

सलीन खान यांना रुग्णालयात दाखल करण्यामागील नेमके कारणही स्पष्ट झालेले नाही. सलमान खानला आज लीलावती रुग्णालय परिसरात पाहण्यात आले. वडिलांना भेटण्यासाठी सलमान खान लीलावती रुग्णालयात आला होता असे सांगितले जात आहे. सलीम खान यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे चाहते आणि सलमान खानच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. सलीन खान यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी ते प्रार्थना करत आहेत.

Salim Khan: सलमान खानच्या वडिलांची प्रकृती बिघडली, लीलावती रुग्णालयात उपचार सुरू
Salman Khan: सलमान खानला मोठा दिलासा; राजस्थान आयोगाने अजामीनपात्र वॉरंटला दिली स्थगिती, काय आहे नेमकं प्रकरण?

'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असलेला सलमान खान आज लीलावती रुग्णालय परिसरात दिसला. रुग्णालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. सलमान खान रुग्णालयाबाहेर चालत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे चाहते चिंतेत आले. सलीन खान यांच्या प्रकृतीबाबत अद्याप खान कुटुंबीयांनी अधिकृत माहिती दिली नाही.

Salim Khan: सलमान खानच्या वडिलांची प्रकृती बिघडली, लीलावती रुग्णालयात उपचार सुरू
Salman Khan : आता सलमान खानच्या जवळच्या नातेवाईकाला जीवे मारण्याची धमकी, ईमेल केला अन्...

दरम्यान, सलीम खान यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९३५ रोजी झाला. ते नुकताच ९० वर्षांचे झाले. त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पटकथा लेखकांपैकी एक मानले जाते. त्यांच्या प्रसिद्ध सलीम-जावेद जोडीने जावेद अख्तर यांच्यासोबत मिळून 'शोले', 'दीवार', 'जंजीर' आणि 'मिस्टर इंडिया' यासह अनेक चित्रपटांची निर्मिती केली. सलीन खान यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात अभिनेता म्हणून केली होती. १९६० च्या दशकात त्यांनी 'बारात' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. २४ पेक्षा अधिक चित्रपटात काम केल्यानंतर ते लेखनाकडे वळाले आणि त्यांनी पटकथालेखन सुरू केले. त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.

Salim Khan: सलमान खानच्या वडिलांची प्रकृती बिघडली, लीलावती रुग्णालयात उपचार सुरू
Salman Khan : सलमान खानचा मेहुणा निशाण्यावर, आयुष शर्माला जीवे मारण्याची धमकी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com