सलमान खानच्या मेहुण्याला बिश्नोई गँगकडून धमकी आली आहे.
आयुष शर्माला ईमेलद्वारे धमकी देण्यात आली
आयुष शर्माची सुरक्षितता वाढवण्यात आली आहे.
बॉलिवूडवर संकटाचे सावट पाहायला मिळत आहे. एका मागोमाग एक बॉलिवूड सेलिब्रेटींना बिश्नोई गँगकडून धमकी येताना दिसत आहे. रोहित शेट्टी, रणवीर सिंगनंतर सलमान खानच्या आणखी एका जवळच्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी आली आहे. सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माचा जीवे देखील धोक्यात आहे. आयुष शर्माला देखील बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा याला धमकीचा ईमेल आला आहे. हा ईमेल लॉरेन्स बिश्नोई टोळीचा असल्याची माहिती मिळाली आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी सांगितले की, आयुषला धमकीचा ईमेल मिळाला होता आणि पाठवणाऱ्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. आयुष शर्माला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून प्रोटॉन मेलद्वारे धमकीचा ईमेल मिळाला होता. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.
सलमान खानला यापूर्वी देखील लॉरेंस बिश्नोई गँग कडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. 2024 मध्ये सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पोलीस आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी करत आहे. तसेच पुरावे शोधत आहे. मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांना वारंवार धमक्या मिळत असल्यामुळे फिल्मी जगतात खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानावर देखील लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून गोळीबार झाला होता. तसेच त्यानंतर रणवीर सिंगला देखील बिश्नोई गँगकडून धमकी आल्याची माहिती मिळाली आहे. रणवीर सिंगला कोट्यवधी रुपयांची मागणी करणारा धमकीचा मेसेज आल्याची माहिती मिळाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही धमकी व्हॉट्सअॅपवर व्हॉइस नोटद्वारे पाठवण्यात आली होती. पोलीसांनी सलमान खान, रणवीर सिंग, रोहित शेट्टी आणि आयुष शर्मा यांची सुरक्षितता वाढवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.