Bigg Boss Marathi 6: 'याची बाहेर गर्लफ्रेंड...'; आयुष आणि तन्वीचा लव्ह अँगल खोटा? रुचिताने केली पोलखोल

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ मध्ये रुचिता जामदारने आयुष संजीवबाबत खळबळजनक दावा केला आहे. आयुषची बाहेर गर्लफ्रेंड आहे का? घरात रंगलेला मोठा वाद वाचा.
Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6Saam Tv
Published On

Bigg Boss Marathi 6: “बिग बॉस मराठी ६”च्या घरात एक मोठा ड्रामा घडला आहे, ज्यानं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. स्पर्धक रुचिता जामदारने घरातील इतर सदस्यांसमोर आयुष संजीवबद्दल एक मोठा दावा केला आहे. ती म्हणाली, तो घराबाहेर आधीच कोणाशी कमिटेड आहे आणि त्याची गर्लफ्रेंड आहे. त्यामुळे त्याचा तन्वी कोलतेसोबतचा लव्ह अँगल खरा नाही.

काही दिवसांपासून आयुष व तन्वी यांची जवळीक सध्या वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांनी Twinning केल्याचं पाहायला मिळालं. तर अनेकदा आयुष्य तन्वीसोबत फ्लर्ट करताना दिसतो. पण यामध्ये रुचिताने एक धक्कदायक खुलासा केला. त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली.

Bigg Boss Marathi 6
Palash Muchhal: 'तो स्मृतीच्या नावावर पैसे घ्यायचा...'; पलाश मुच्छलवर स्मृती मंधानाच्या बालमित्राने लावले गंभीर आरोप

या सर्व चर्चेचा फोकस आयुष व तन्वीच्या रिलेशनशिपवर आहे. जे घरात नेहमी चर्चेचा विषय बनत आहे. आयुष आणि तन्वीवर घरात नेहमी जवळ दिसले असले तरी रुचिताने मत व्यक्त करत सांगितले, “याची बाहेर गर्लफ्रेंड आहे… इथे कसली नाटकं सुरू आहेत?”, असं ती म्हणाली.

Bigg Boss Marathi 6
Oscars 2026: ऑस्कर 2026 च्या नॉमिनेशनमध्ये 'सिनर्स'चा दबदबा; १६ कॅटेगरीमध्ये निवड, रचला नवा इतिहास

हा दावा ऐकून घरातील राधा म्हणाली, “अच्छा हे गेमसाठी सुरू आहे… मला हे आवडलं नाही”, तर अनुश्री माने रागात म्हणाली की, “तू जर बाहेर कमिटेड आहेस आणि हा फक्त गेम आहे तर हे चुकीचं आहे.“ बिग बॉस मराठी ६ हा रिअॅलिटी शो कलर्स मराठीवर प्रसारित होत आहे आणि रोज रात्री ८ वाजता प्रेक्षकांना नवीन भाग पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com