Bigg Boss 19: 'सलमान खानसोबत स्टेज शेअर करू नको...'; प्रसिद्ध अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोई गँग कडून धमकी

Bigg Boss 19: बिग बॉस 19 च्या अंतिम फेरीच्या आधी, भोजपुरी स्टार पवन सिंगला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकीचा फोन आला आहे. नेमक कारण काय ते जाणून घेण्यासाठी वाचा.
Bigg Boss 19
Bigg Boss 19Saam Tv
Published On

Bigg Boss 19: भोजपुरी इंडस्ट्रीचा "पॉवर स्टार" पवन सिंगला लखनऊमध्ये जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका अज्ञात नंबरवरून कॉल करणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे सांगितले आणि सलमान खानसोबत स्टेज शेअर करू नये असा इशारा दिला. तसेच या कॉलमध्ये पवन सिंगकडून मोठ्या रकमेची मागणीही करण्यात आली आहे.

बिग बॉसच्या अंतिम फेरीत पवन सिंग दिसला आहे म्हणून ही धमकी त्याला मिळाली आहे. पवन सिंगच्या टीमने तात्काळ पोलिस आणि सुरक्षा एजन्सींना कळवले, त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Bigg Boss 19
Saree Draping Style: लग्नसराईसाठी साडी ड्रेपिंगच्या नविन आयडिया शोधताय? मग या पद्धतीने साडी नक्की नेसून मिळेल ग्लॅमरस लूक

लॉरेन्स बिश्नोई टोळीची धमकी आणि कारण

पवन सिंगला शनिवारी एका अज्ञात नंबरवरून ही धमकी मिळाली. कॉल करणाऱ्याने स्पष्टपणे सांगितले की तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य आहे आणि पवन सिंगला सलमान खानसोबत स्टेज शेअर करण्यापासून रोखू इच्छित होता. फोन करणाऱ्याने धमकी दिली की जर त्याने असे केले तर त्याला इंडस्ट्रीत काम करू दिले जाणार नाही. त्या अज्ञात व्यक्तीने मोठी खंडणीही मागितली. सलमान खानला यापूर्वी बिश्नोई टोळीने धमकी दिली आहे, त्यामुळे ही धमकी अत्यंत गंभीर मानली जात आहे.

Bigg Boss 19
Bigg Boss 19: बिग बॉस १९ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक कोण? टॉप ५ स्पर्धकांची कमाई जाणून घ्या

पवन सिंग बिग बॉसच्या अंतिम फेरीत सहभागी

पवन सिंग हा भोजपुरी चित्रपट उद्योगातील "पॉवर स्टार" म्हणून ओळखला जातो आणि तो बिग बॉस १९ च्या ग्रँड फिनालेला उपस्थित राहिला आहे. धमक्या मिळाल्या असूनही, त्याने शोमध्ये उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अंतिम फेरीदरम्यान पोलिसांनी त्याच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केली होती. ७ डिसेंबर रोजी बिग बॉसची अंतिम फेरी पार पडतं आहे. यावेळी पवन सिंगने एका भोजपूरी गाण्यावर निलम आणि सलमान खानसोबत डान्स केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com