Shruti Vilas Kadam
Bigg Boss 19 मध्ये गौरव खन्ना (Gaurav Khanna) हा सीझनमधला सर्वाधिक मानधन घेणारा आहे.
त्याला शोमधून दर आठवड्याला सर्वाधिक रक्कम म्हणजेच १७.८ लाख मानधन दिले जाते, त्यामुळे तो यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
फरहाना भट्ट ही सिझनमधील चर्चेत असलेली महिला स्पर्धक असून तिचे फॅन-फॉलोइंग वेगाने वाढत आहे. तिला दर आठवड्याला 2-4 लाख रुपये मानधन मिळतं.
संगीत दिग्दर्शक अमाल मलिक देखील चांगली फी घेत असून त्याला दर आठवड्याला 8.75 लाख मानधन मिळते.
प्रणीत मोरे हा या सीझनमधील लोकप्रिय स्पर्धक असून प्रेक्षक त्याला मोठ्या प्रमाणात सपोर्ट करत आहेत. या महाराष्ट्रीयन भाऊला 2-3 लाख रुपये दर आठवड्याला मानधन मिळते.
तान्या मित्तल ही तिच्या प्रॉपर्टी आणि शो ऑफमुळे सतत चर्चेत राहणारी स्पर्धक आहे.तिला दर आठवड्याला 3 लाख ते 6 लाख रुपये मानधन मिळते.
चाहत्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. "बिग बॉस १९" चा ग्रँड फिनाले आज, ७ डिसेंबर रोजी आहे. या सीझनचा विजेता काही तासांतच जाहीर होईल.