Nashik: नाशिक हादरले! २ तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू, कामासाठी शेताकडे गेले; पण परत आलेच नाहीत

Nashik Farmers Death: नाशिकमध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतामध्ये वीज पंप दुरूस्तीच्या कामासाठी हे दोन्ही शेतकरी गेले होते. पण अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने दोन्ही शेतकऱ्यांना विजेचा तीव्र झटका लागून मृत्यू झाला.
Nashik: नाशिक हादरले! २ तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू, कामासाठी शेताकडे गेले; पण परत आलेच नाहीत
Nashik Farmers DeathSaam Tv
Published On

Summary -

  • नाशिकमध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

  • नाशिकच्या साकोरा गावातील दुर्दैवी घटना

  • वीज पंप दुरुस्ती करताना विजेचा धक्का लागला

  • तरुण शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे

अजय सोनावणे, नाशिक

नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकच्या साकोरा येथे ही घटना घडली. पांझण नदीवरील वीज पंप दुरुस्ती करताना ही भयंकर घटना घडली. शिरीष भगवान पठाडे आणि जगदिश तुकाराम खैरनार अशी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची नावं आहेत. या शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे साकोरा गावावर शोककळा पसरली आहे. या दोन्ही शेतकऱ्यांचे मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पांझण नदीपात्रातील विजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या २ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पांझण नदीपात्रात गेल्या काही वर्षांपासून ५० ते ५० शेतकऱ्यांचे विजपंप कार्यरत आहेत. आज साकोरा येथील शिरीष भगवान पठाडे(४२ वर्षे) आणि जगदिश तुकाराम खैरनार (३६ वर्षे) हे दोघे तरूण शेतकरी पांझण नदीवर वीज पंप सुरू करण्यासाठी गेले.

Nashik: नाशिक हादरले! २ तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू, कामासाठी शेताकडे गेले; पण परत आलेच नाहीत
Jalgaon: पोलिस दलात खळबळ! जळगावमध्ये पोलिसाची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास

वीज पंप दुरूस्त करत असताना भयंकर घडलं. शिरीष आणि जगदिश हे दोघे वीज पंप पाण्याबाहेर असल्याने तो पाण्यात खेचण्याच्या प्रयत्न करत होते. त्याचवेळी पाण्यात अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने दोन्ही शेतकऱ्यांना विजेचा तीव्र झटका लागला. या घटनेत दोन्ही शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

Nashik: नाशिक हादरले! २ तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू, कामासाठी शेताकडे गेले; पण परत आलेच नाहीत
Jalgaon: महाराष्ट्र हादरला! ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आई घरात नसताना नातेवाईकाचं भयंकर कृत्य

पाण्यावर दोघांचे मृतदेह तरंगताना पाहून गावकरी प्रचंड घाबरले. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी दोघांचे मृतदेह नदीबाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिस सध्या या प्रकरणाच तपास करत आहेत.

Nashik: नाशिक हादरले! २ तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू, कामासाठी शेताकडे गेले; पण परत आलेच नाहीत
Jalgaon Crime: नाशिकनंतर जळगावमध्ये भोंदू कांड, करणी झाल्याचे महिलेला सांगून अघोरी पूजा, पोलिस पत्नीनेही दिली साथ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com