

उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ड्युटी दरम्यान चहा घेण्यासाठी गेलेल्या 29 वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काही सेकंदात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतो आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय कुशवाहा हा झांसी शहरातील नवाबस्ती भागात राहात होता. तो रेल्वेच्या डीआरएम कार्यालयात चालक म्हणून कार्यरत होता. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्याला सुमारे दोन वर्षांपूर्वी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती. सोमवारी संध्याकाळी 4 ते रात्री 12 या वेळेत त्याची ड्युटी होती.
संध्याकाळी सुमारे 7 वाजून 49 मिनिटांनी अजय त्याच्या ऑफिसपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या चित्रा चौकातील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेला. सीसीटीव्ही फुटेजनुसार, त्याने शांतपणे चहा घेतला आणि पैसे दिल्यानंतर बाहेर पडला. त्यानंतर तो प्लास्टिकची पिशवी मागत असताना अचानक तोल जाऊन खाली कोसळला.
हॉटेल चालक लोकेंद्र पांडे यांनी ही घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. त्यांनी सांगितलं की, तो पूर्णपणे सामान्य दिसत होता. अचानक तो पडल्याने सुरुवातीला आम्हाला चक्कर किंवा फीट आली असावी असं वाटलं. घटनेनंतर उपस्थित लोकांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणालाही सीपीआर देण्याची माहिती नसल्याने मदत वेळेत मिळू शकली नाही.
घटनेनंतर सुमारे 10 ते 20 मिनिटांनी त्याचे सहकारी आणि कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्याला तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. प्राथमिक अंदाजानुसार, अजयचा मृत्यू हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्टमुळे झाला असावा, असा संशय व्यक्त केला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.