

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि तितकाच चकित करणारा व्हिडिओ प्रमाणात व्हायरल होत आहे. एका मोबाईल दुकानात लूट करण्याच्या उद्देशाने आलेल्या काही लोकांना एका अनोख्या युक्तीमुळे स्वतःच आत अडकून पडावं लागलंय. हा व्हिडिओ नेमका कुठल्या ठिकाणचा आहे हे माहिती नाहीये. मात्र सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल झालाय.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही काही व्यक्ती तोंड बांधून एका मोबाईल दुकानात घुसताना दिसतात. त्यांच्या हालचालींवरून ते दुकान लुटण्याच्या उद्देशाने आले असल्याचं स्पष्ट होतंय. दुकानात असलेल्या काही ग्राहकांना परिस्थितीची जाणीव होताच ते घाबरून बाहेर पडू लागतात. विशेष म्हणजे हे चोर त्या ग्राहकांना बाहेर जाण्यापासून अडवत नाहीत.
याच दरम्यान एक अनपेक्षित घटना घडते. दुकानातून बाहेर पडलेल्या लोकांपैकीच एक व्यक्ती दुकानाचे शटर बाहेरून बंद करून टाकलं. यामुळे लूट करण्यासाठी आलेले सर्व लोकं दुकानाच्या आतच अडकून पडतात. व्हिडिओमध्ये पुढे हे लोक शटर उघडण्याचा प्रयत्न करताना दिसतात, मात्र त्यांना ते जमत नाही.
हा व्हिडिओ X या प्लॅटफॉर्मवर @ItsKtyni नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर काही तासांतच तो लाखो लोकांनी पाहिला असून मोठ्या प्रमाणावर शेअरही केला जातोय. पोस्टसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की, “मोबाईल शॉप लुटायला आले, पण कुणीतरी बाहेरून शटर बंद केलं. आता चोर बाहेर पडण्यासाठी विनंती करतायत”
या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटतायत. अनेकांनी शटर बंद करणाऱ्या व्यक्तीच्या चलाखीचं कौतुक केलंय. तर एका यूजरने लिहिलंय की, ही खरोखरच स्मार्ट मूव्ह होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.