Accident: मुंबई-आग्रा महामार्गावर अपघाताचा थरार, पोलिसांच्या वाहनानं व्यावसायिकाला चिरडलं; जागीच सोडले प्राण

Manmad Accident: मनमाडमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये व्यावसायिकाचा मृत्यू झाला. पोलिसांच्या वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.
Accident:  मुंबई-आग्रा महामार्गावर अपघाताचा थरार, पोलिसांच्या वाहनानं व्यावसायिकाला चिरडलं; जागीच सोडले प्राण
Manmad AccidentSaam Tv
Published On

Summary -

  • मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

  • पोलिस वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली

  • या अपघातामध्ये व्यावसायिक रमेश गारे यांचा जागीच मृत्यू झाला

  • या अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली

अजय सोनावणे, मनमाड

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. पोलिसांच्या वाहनाने व्यावसायिकाला चिरडलं. या अपघातामध्ये व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. मालेगावच्या चांदवडजवळील मंगरूळ शिवारात ही घटना घडली. अपघातानंतर मुंबई- आग्रा महामार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास मंगरूळ येथील गुरुद्वारासमोर पोलिसांच्या वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे चांदवड येथील प्रसिद्ध वीट उत्पादक रमेश गारे यांचा जागीच मृत्यू झाला. रमेश गारे हे आपल्या दुचाकीवरून मुंबई-आग्रा महामार्गावरून जात होते. मंगरूळ येथील गुरुद्वाराच्या समोर आले असता त्यांच्या दुचाकीला पोलिसांच्या वाहनाने जोरदार धडक दिली.

Accident:  मुंबई-आग्रा महामार्गावर अपघाताचा थरार, पोलिसांच्या वाहनानं व्यावसायिकाला चिरडलं; जागीच सोडले प्राण
Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! ट्रक आणि डिझेल टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू

रमजानपुरा पोलिस ठाण्याचे हे वाहन होते. हा अपघात इतका भीषण होता की, पोलिस वाहनाच्या धडकेनंतर रमेश गारे हे दुचाकीवरून दूरवर रस्त्यावर फेकले गेले. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे रमेश गारे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत. ​

Accident:  मुंबई-आग्रा महामार्गावर अपघाताचा थरार, पोलिसांच्या वाहनानं व्यावसायिकाला चिरडलं; जागीच सोडले प्राण
Accident : मध्यरात्री हायवेवर मृत्यूचं तांडव, लग्नाहून आलेली कार आधी डिव्हायडरला धडकली मग....; ६ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com