- सचिन कदम
Poladpur Ghat News : सततच्या पावसामुळे पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळण्याचे (Ambenali Ghat Landslide) प्रकार अद्यापही सुरूच आहे. आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास घाट मार्गात दरड काेसळल्याने दक्षता म्हणून प्रशासनाने घाटातील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra News)
गेल्या दाेन दिवसांपासून सातारा आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा चांगला जाेर आहे. पावसामुळे काही जिल्ह्यात दरडी काेसळण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली हाेती. दरम्यान मंगळवार रात्रीपासून आंबेनळी घाटात दरड कोसळण्याच्या घटना समाेर आल्या. त्याचा परिणाम पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूकीवर झाला. या घाटातील वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर पुन्हा दरड कोसळण्याचा प्रकार झाला. परंतु त्याचा वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही.
दरम्यान आज (गुरुवार) पहाटे पोलादपुर- महाबळेश्वर मार्गावर पुन्हा दरड कोसळली. सातारा (satara) जिल्ह्यातील मेटतळे धबधब्या जवळ दरड कोसळली. आर्धा रस्ता खुला असला तरी दक्षतेचा इशारा म्हणुन मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. बुधवारी तीन वेळा आंबेनळी घाटात तर गुरुवारी पहाटे सातारा हद्दीत दरड कोसळल्याने तसेच पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.