Shocking : टिटवाळ्यात भयंकर घडलं! बंद खोलीत आढळला डॉक्टरचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा उघडला अन्...

Titwala Doctor Suicide News : टिटवाळ्यातील परिचित डॉक्टर डॉ. सचिन सातपुते यांचा राहत्या घरी मृत्यू झाला. आत्महत्येचा प्राथमिक अंदाज असून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी टिटवाळा पोलिसांचा तपास सुरू आहे.
Dr Sachin Satpute Death In Titwala
Dr Sachin Satpute Death In TitwalaAI Image
Published On
Summary
  • टिटवाळ्यातील डॉक्टर डॉ. सचिन सातपुते यांची आत्महत्या

  • राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

  • टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

Titwala Doctor Sachin Satpute Sucide Update News डॉक्टर म्हणजेच आजारांच्या विळख्यातून आणि मृत्यूच्या दाढेतून रुग्णांना परत आणणारे. या डॉक्टरांना रुग्ण देवस्वरूप मानतात. अशाच एका टिटवाळ्यातील नामांकित डॉक्टरने अनेक वर्ष रुग्णांची सेवा करून त्यांच्या मनात घर केले. मात्र आता त्यांचा हा प्रवास अर्ध्यातच संपला. टिटवाळा पूर्वेकडील हरी ॐ व्हॅली परिसरात राहणाऱ्या डॉ. सचिन सातपुते यांनी राहत्या घरात आत्महत्या केली आणि एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून सचिन यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला. सदर घटना मंगळवारी सकाळी १० वाजता निदर्शनास आली. प्रथमदर्शनी ही आत्महत्येची घटना असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे.

Dr Sachin Satpute Death In Titwala
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

डॉ. सातपुते यांचा मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल तसेच पोलिसांच्या तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींची माहिती तपासली जात आहे.

Dr Sachin Satpute Death In Titwala
Gold Rate Today : सोने - चांदीचे दर गगनाला भिडले! सोन्याचे भाव ४,३०० रुपयांनी वधारले; 24k,22k,18k चे ताजे दर वाचा

डॉ. सचिन सातपुते हे टिटवाळा परिसरातील परिचित वैद्यकीय व्यावसायिक होते. उपलब्ध माहितीनुसार, ते ‘हिमालय क्लिनिक’च्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करत होते. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार करून वैद्यकीय सेवा बजावल्याचे त्यांच्या परिचितांकडून सांगण्यात येते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे आणि आपुलकीचे नाते निर्माण झाले होते.

Dr Sachin Satpute Death In Titwala
SBI Bank : SBI खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी; १ ऑक्टोबरपासून कॅश विड्रॉलचे नवे नियम, ग्राहकांना भुर्दंड

दरम्यान, त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूची बातमी परिसरात पसरताच नागरिक, रुग्ण आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, पोलिसांकडून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील निष्कर्षानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com