Sangli News: राष्ट्रवादीचे कार्यकर्त्याच्या खून प्रकरणी आणखी तिघांना अटक; धक्कादायक घटनेनं सांगली हादरलं

Crime News Today: नालसाब मुल्ला खून प्रकरणी पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे.
Sangli News
Sangli NewsSaam Tv

Sangli News Today: सांगलीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला खून प्रकरणी पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. रोहित, प्रशांत आणि ऋत्विक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Latest Marathi News)

Sangli News
Omicron Vaccine: पुण्यात देशातील पहिली ओमिक्रॉन बुस्टर लस तयार; लवकरच येणार बाजारात

संशयित तिघे हे मुल्ला याचा खून झाला त्यावेळी घटनास्थळी उपस्थित होते. या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे हा सध्या कळंबा कारागृहात असून त्याला ताब्यात घेण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरु केल्या आहेत.

नालसाब मुल्ला याचे शंभर फुटी रस्त्यावर बाबा चौकात निवासस्थान आहे. शनिवारी तो वाचनालयाजवळ थांबला होता. तेव्हा अंधारात दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. (Sangli Crime News)

या हल्ल्यात मुल्लाच्या छातीवर आणि पोटावर गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, एलसीबीच्या पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. अटकेतील सनी, विशाल आणि स्वप्निल या तिघांकडे कसून चौकशी केली असता त्यांच्यासोबत आणखी तिघे असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांच्या (Police) पथकाने रोहित, प्रशांत आणि ऋत्विक या तिघांना अटक करण्यात आली.

Sangli News
Satara News : शिवेंद्रराजेंसह 81 जणांवर गुन्हा दाखल; दाेन्ही राजे फडणवीसांच्या भेटीला (पाहा व्हिडिओ)

६ हल्लेखोरांना अटक

दरम्यान, नालसाब मुल्ला खून प्रकरणी एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी गोळ्या झाडण्यासाठी वापरलेली पिस्तूले जतमधून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासासाठी पोलिसांचे पथक जतला रवाना करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com