- ओंकार कदम / संभाजी थाेरात
Shivendraraje Bhosale News : खासदार उदयनराजे भाेसले यांचे कुळ असणारे शेतकरी संपत जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सातारा पाेलिसांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह जवळपास 81 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पाेलिस ठाण्यातून देण्यात आली. (Maharashtra News)
खासदार उदयनराजे भाेसले यांच्या विराेध झुगारुन सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन (satara krushi utpanna bazar samiti building bhoomipujan) बुधवारी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (Shivendraraje Bhosale) यांनी खिंडवाडी येथे केले.
त्यापुर्वी काही शेतक-यांनी आमदार भाेसले यांना आम्ही येथे कूळ आहाेत. आमच्या जागेत जाउ नये अशी विनंती शिवेंद्रराजेंना केली हाेती. यावेळी आमदार भाेसले यांनी आम्ही सर्व कायदेशीरच करत आहाेत असं म्हणत शिवेंद्रराजेंनी कार्यक्रम पार पाडला.
दरम्यान आमदार शिवेंद्रराजे भाेसले यांच्या विराेधात संपत जाधव यांनी सातारा पाेलिसांत तक्रार दाखल केली. त्यानूसार पाेलिसांनी (कलम 504, 506, 427 कलमांतर्गत) बेकायदेशीर जमाव जमवून वहिवाटदार यांच्या जागेत येऊन दमदाटी केल्याप्रकरणी आमदार शिवेंद्रराजे भाेसले यांच्यासह (51 ओळखीचे आणि 25 ते 30 अनोळखी) सुमारे 80 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान सातारा पाेलिसांनी खासदार उदयनराजे भाेसले यांच्यावर देखील सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विक्रम पवार यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.
दाेन्ही राजे फडणवीसांच्या भेटीला
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज कराड येथे आले आहेत. फडणवीस यांची आमदार शिवेंद्रराजे भाेसले आणि खासदार उदयनराजे भाेसले यांनी भेट घेतली. अर्थातच दाेन्ही राजेंनी फडणवीस यांची स्वतंत्र भेट घेतली आहे. या दाेन्ही नेत्यांच्या भेटीने सातारावासियांमध्ये तर्क वितर्क लढविले जात आहे. अद्याप भेटीचा तपशिल मात्र समजू शकला नाही.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.