Omicron Vaccine: पुण्यात देशातील पहिली ओमिक्रॉन बुस्टर लस तयार; लवकरच येणार बाजारात

Pune News Today: स्वदेशी यंत्रणा वापरून या लशीची निर्मिती करण्यात आली आहे.
Omicron Vaccine
Omicron VaccineSaam Tv

Pune News: डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीकडून (DBT) देशातील पहिली ओमायक्रॉन प्रतिबंधित लस तयार करण्यात आली आहे. स्वदेशी यंत्रणा वापरून या लशीची निर्मिती करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

कोव्हिशिल्ड अथवा कोव्हॅक्सिन ही लस घेतलेल्या व्यक्तींना ही लस घेता येणार आहे. जेमकोव्हॅक ओएम असे या लसीचे नाव आहे. जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स कंपनीकडून लस विकसित करण्यात आली आहे. नविन व्हेरियंटवर मात करण्यासाठी ही लस प्रभावी असल्याचे बोलले जात आहे.

Omicron Vaccine
PM Modi Meets Joe Biden : जो बायडन यांच्या पत्नीला मोदींकडून ग्रीन डायमंड गिफ्ट, पाहा गिफ्टची संपूर्ण लिस्ट

कंपनीने दावा केला आहे की जेमकोव्हॅक ओएम ही लस पहिली बूस्टर लस आहे जी कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराविरुद्ध भारतात विकसित केली गेली आहे. ही लस जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सने 'मिशन कोविड सुरक्षा' अंतर्गत जैवतंत्रज्ञान विभाग (DBT) च्या सहकार्याने विकसित केली आहे. (Pune News)

या लशीचा तातडीचा वापर करण्यास औषध नियंत्रकांनी परवानगीही दिली आहे. भारतात विकसित झालेली ही पहिली बूस्टर लस आहे. ओमिक्रॉन (Omicron) हा सर्वाधिक संसर्गजन्य प्रकार होता. ही लस त्यावर परिणामकारक ठरत असल्याचे वैद्यकीय चाचण्यांतून समोर आले आहे.

Omicron Vaccine
Satara News : उदयनराजे आहेतच, तरीही... सातारा लाेकसभा मतदारसंघात भाजप शाेधताेय उमेदवार?

लस कधी येणार बाजारात

पुढील दोन ते तीन आठवड्यांत ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे. दिल्लीत एका कार्यक्रम आयोजित करून ही लस सादर केली जाणार असून त्याचवेळी लशीची किंमत जाहीर केली जाणार आहे. सध्या कसौली येथे या लशीच्या १२ लाख बूस्टर डोसचा साठा ठेवण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com