Mayor Election: ठाण्याचा कारभारी ठरला; कोण बनलं महापौर, कोण असणार उपमहापौर? जाणून घ्या

Thane Mayor Election: ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदी शिवसेना नेत्या शर्मिला पिंपळकर यांची नियुक्ती झालीय. तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. जवळपास चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीचा अंत झालाय.
THANE MAYOR ELECTION 2026: SHARMILA PIMPALKAR ELECTED MAYOR,
THANE MAYOR ELECTION 2026: SHARMILA PIMPALKAR ELECTED MAYOR,
Published On
Summary
  • ठाणे महापालिकेत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपची सत्ता स्थापन झालीय.

  • शर्मिला पिंपळोलकर महापौर, कृष्णा पाटील उपमहापौर पदी निवड झालीय.

  • जवळपास चार वर्षांची प्रशासकीय राजवट संपली आहे.

ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदी तर, भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे ३ वर्षे १० महिन्यानंतर पालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आलेली आहे.

THANE MAYOR ELECTION 2026: SHARMILA PIMPALKAR ELECTED MAYOR,
BMC Mayor Election: महापौरपदासाठी भाजपची मोठी खेळी; मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार?

ठाणे महापालिका निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुक निकालानंतर ३ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुक जाहीर झाली. शिंदे गटाच्या शिवसेनेने ७५ नगरसेवक निवडून आणले असून, एका अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिल्यामुळे हे संख्याबळ ७६ वर गेले आहे. ठाणे महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ६६ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक होते.

ठाणे महापालिकेची निवडणूक युतीत लढविण्यात आली असल्यामुळे महापौर पद द्या अन्यथा विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावू, असा हट्ट भाजपने धरला होता. मात्र, दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि यामुळे महापौर आणि उपहापौर पदासाठी अर्ज दाखल करतेवेळी भाजपने महापौर पदाचा हट्ट सोडत शिवसेना पक्षासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

THANE MAYOR ELECTION 2026: SHARMILA PIMPALKAR ELECTED MAYOR,
Mayor Election: महापौर निवड कधी होणार? संभाव्य तारखा आल्या समोर; मुंबई, पुण्याचा कधी ठरणार?

शिवसेना पक्षातर्फे महापौर पदासाठी शर्मिला पिंपळोलकर तर भाजपतर्फे उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल झालेले नसल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाली आहे. ठाणे महापालिकेच्या आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना पक्षाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदी तर, भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

या सभेत ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम केले तर, मनीष जोशी यांनी सचिव म्हणून काम केले. ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू होती. महापौर आणि उपहापौरांच्या निवडीमुळे ३ वर्षे १० महिन्यानंतर पालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आलेली आहे. शहरातील विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे शर्मिला गायकवाड यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com