स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी राजकीय उलथापालथही पाहायला मिळत आहे. ठाकरे गटातून अनेक नेते हे भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जळगावमध्ये भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाला मोठे सुरुंग लावले आहे.
महाविकासआघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. अशातच आज ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. जळगावमध्ये ऐन निवडणुकीच्यावेळेस ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असून महापलिकेतील ठाकरे गटाचे 13 माजी नगरसेवक तसेच माजी महापौर नितीन लढ्ढा हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. जळगाव येथील भाजप आज संध्याकाळी कार्यालयमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.
भाजपमध्ये यांचा प्रवेश
शिवसेनेत फुट पडल्यानंतर याआधीच अनेक दिग्गज नेते हे शिंदे गटात गेले आहे. त्यात आता अनेक नेते हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यामध्ये माजी महापौर लढ्ढा यांच्यासह सुनील महाजन, जयश्री महाजन, प्रशांत नाईक, आबा कापसे, प्रतिभा कापसे, इकबाल पिरजादे, पिंटू सपकाळे, हर्षा अमोल सांगोरे, जाकीर पठाण, फिरोज पठाण आदींसह इतर काही पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित सर्व पदाधिकारी मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यास भाजपचे महानगर जिल्हाप्रमुख दीपक सूर्यवंशी यांनीही दुजोरा दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.